Indian Rice Exports To US: अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवरील आयात शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे तांदळाच्या निर्यातीला चालना मिळणार असल्याची आशा निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे भारताला तांदूळ निर्यातीसाठी थायलंड आणि पाकिस्तानसारख्या प्रमुख प्रतिस्पर्धी देशांशी बरोबरीने स्पर्धा करण्याची संधी मिळेल. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय निर्यातदारांना आघाडी घेता येईल, अशी प्रतिक्रिया इंडियन राइस एक्सपोर्टर्स फेडरेशनने (IREF) दिली आहे..'आयआरईएफ'ने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याने भारतीय तांदळावरील आयात शुल्काचा भार लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. या निर्णयामुळे थायलंड आणि पाकिस्तानसारख्या प्रतिस्पर्धी देशांशी पुन्हा समानता प्रस्थापित होईल. कारण सध्या या देशांतून होणाऱ्या तांदूळ निर्यातीवर सुमारे १९ टक्के शुल्क आकारले जाते..Rice Exports: फिलीपिन्स, सेनेगलला तांदूळ निर्यातीचा मार्ग मोकळा, 'अपेडा'कडून नोंदणी सुरु.'आयआरईएफ'चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेम गर्ग यांनी म्हटले आहे की, “देशातील सुमारे १४९ दशलक्ष मेट्रिक टन विक्रमी उत्पादन, मुबलक साठा आणि देशांतर्गत मूलभूत परिस्थितीत तांदूळ निर्यातीला चालना मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. यामुळे हा निर्णय भारतीय तांदूळ निर्यातीसाठी अर्थपूर्ण आणि सकारात्मक ठरेल.”.Rice Export: तांदूळ निर्यात वाढवण्यासाठी छत्तीसगड सरकारचा महत्त्वाचा निर्णय .त्यांनी पुढे म्हटले आहे की, "जागतिक पुरवठा साखळीत भारतीय शेती उत्पादने अजूनही आपले अत्यावश्यक स्थान टिकवून ठेवून आहेत. अलीकडील पुरवठा पद्धती पाहता, आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरीही मागणी कायम असल्याचे स्पष्ट दिसून येते.”.आयात शुल्कात १० टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतरही अमेरिकेत भारतातून होणारी तांदळाची निर्यात वाढली असल्याचे फेडरेशनने नमूद केले आहे. 'आयआरईएफ'च्या मते, हा कल स्पष्टपणे अधोरेखित करतो की अमेरिकेच्या बाजारात खरेदीदार आणि ग्राहकांकडून भारतीय तांदळाला मागणी कायम आहे. यामुळे भारताची स्पर्धात्मकता संरचनात्मकदृष्ट्या मजबूत असल्याचे दिसून येते. आता शुल्कातील समानतेमुळे लवकरच निर्यातीचे प्रमाण वाढण्याची तसेच दराच्या बाबतीत अधिक चांगले वातावरण तयार होण्याची शक्यता आहे..शुल्क कपात केल्याने आयातीनंतरची किंमत अधिक स्पर्धात्मक बनेल आणि बासमती तसेच बिगर-बासमती तांदळाची विक्री वाढेल. यामुळे भारताला अमेरिकेतील बाजारपेठेतील आपला वाटा टिकवून ठेवण्यास आणि वाढवण्यास मदत होईल. तसेच इतर निर्यातदार देशांशी अधिक प्रभावीपणे स्पर्धा करता येईल, अशी आशा फेडरेशनने व्यक्त केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.