Pune News: सध्या अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणात स्पष्टता नाही. अमेरिकेला आयात शुल्काची संरचना अंतिम करावी लागेल. अमेरिकेच्या बाजारपेठेत भारताला स्पर्धक देशांसोबत तुलनात्मक लाभ मिळणार नाही तोपर्यंत व्यापार करार केला जाणार नाही, अशी भूमिका भारत सरकारने घेतली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका व्यापार करार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे..भारत आणि अमेरिकेकडून फेब्रुवारी महिन्यात व्यापार कराराची घोषणा करून अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले होते. अमेरिकेने भारतावरील आयात शुल्क कमी करून १८ टक्क्यांपर्यंत आणले होते. अमेरिकेसोबत अनेक देश आपल्या प्रतिस्पर्धी देशाच्या सवलती लक्षात घेऊन व्यापार करार करत होते. मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने इंटरनॅशनल इमर्जन्सी इकाॅनाॅमिक पाॅवर ॲक्ट अंतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच देशांवर लादलेले शुल्क अवैध ठरवले. त्यानंतर लगेच ट्रम्प यांनी व्यापार कायद्याच्या १२२ कलमांतर्गत १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे..India US Trade Deal : पंजाबच्या विधानसभेत भारत-अमेरिका व्यापार करारविरोधात ठराव मंजूर; शेतकरी आंदोलनाचे दिले संकेत.न्यायालयाने दणक्यानंतर ट्रम्प यांना मनमानी पद्धतीने आयात शुल्क लावता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक देशांनी व्यापार कराराच्या वाटाघाटी पुढे ढकलल्या आहेत. अंतिम झालेल्या वाटाघाटी काही देशांकडून बदलण्याची मागणी केली आहे. शेजारच्या बांगलादेशनेही झालेल्या व्यापार कराराचा पुनर्विचार करावा, अशी मागणी अमेरिकेकडे केलेली आहे. मलेशिया या देशाने झालेला व्यापार करार रद्द केला आहे. तर युरोपियन महासंघानेही व्यापार कराराच्या वाटाघाटींना स्थगिती दिली आहे..India US Trade: जागतिक बाजाराची विस्कटलेली घडी पुन्हा बसेल?.भारत अमेरिकेतील व्यापार करारावर मार्च महिन्यात स्वाक्षऱ्या होणार होत्या. पण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि सध्या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे आणखी विलंब होत आहे. अमेरिकेची जागतिक आयात शुल्क आकारणी संरचना अंतिम होत नाही तोपर्यंत भारत व्यापार करारावर स्वाक्षरी करणार नाही. अमेरिकेने प्रत्येक देशांवरील आयात शुल्क स्पष्ट केल्यानंतर भारत व्यापार करारावर सही करेल, असे सरकारच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेच्या बाजारात भारतावर प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत किती शुल्क द्यावे लागेल, भारताला स्पर्धात्मकता असेल का? यावर करार अवलंबून असेल. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार आणखी काही महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे..अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही उत्पादनांवर इंटरनॅशनल इमर्जन्सी इकाॅनाॅमिक पाॅवर ॲक्टचा वापर अवैध ठरवल्यानंतर ट्रम्प यांनी सर्वच देशांच्या काही उत्पादनांवर १० टक्के शुल्क लागू केले आहे. भारत व्यापार करारासाठी अमेरिकेसोबत चर्चा सुरूच ठेवणार आहे. पण अमेरिकेने आयात शुल्काची संरचना अंतिम केल्यानंतर करार केला जाईल.राजेश अग्रवाल, वाणिज्य सचिव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.