देशात २०२५ मधील खरिपात भाताचे विक्रमी १ हजार २४५ लाख टन उत्पादनाचा अंदाज हे उत्पादन २०२४ मधील खरिपाच्या तुलनेत १७ लाख टनांनी अधिक एकूण १ हजार ७३४ लाख टन धान्य उत्पादन होण्याचा अंदाजखरिपात एकूण कडधान्ये उत्पादन ७४ लाख टन मिळण्याची शक्यता तेलबियांचे उत्पादन २७५ लाख टन होण्याचा अंदाज.Kharif Season Rice Production: देशात २०२५ मधील खरीप हंगामात भाताचे विक्रमी १ हजार २४५ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन २०२४ मधील खरीप हंगामाच्या तुलनेत १७ लाख टनांनी अधिक आहे, असे नुकत्याच जारी केलेल्या २०२५-२६ मधील धान्य उत्पादनाच्या पहिल्या आगाऊ अंदाजात म्हटले आहे..२०२५-२६ मधील खरिपात एकूण १ हजार ७३४ लाख टन धान्य उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे २०२४-२५ मधील खरीप हंगामापेक्षा सुमारे ३९ लाख टनांनी अधिक आहे..Rice Research: साध्या भातजातीमध्ये सुगंध आणण्यात पुण्याच्या शास्त्रज्ञांना यश.खरीप हंगामातील पीक पेरणीला जूनपासून सुरूवात होते. तर ऑक्टोबरपासून पीक कापणी सुरू होते..खरीप हंगामातील मक्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या खरिपात मक्याचे सुमारे २८३ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३५ लाख टनांनी अधिक असेल..India Rice Exports: भारतीय तांदळाला जगभरातून मोठी मागणी, यंदा १० टक्के निर्यात वाढणार.शेतमाल उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज जाहीर करताना, कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, देशातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असले तरी, बहुतांश भागांत चांगल्या मॉन्सूनमुळे मोठा फायदा झाला. यामुळे एकूणच पिकांची वाढ चांगली झाल्याचे दिसून आले..खरिपात एकूण कडधान्ये उत्पादन ७४ लाख टन मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ७७ लाख टन उत्पादन होते. तर तेलबियांचे उत्पादन २७५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या २८० लाख टनांच्या तुलनेत किंचित कमी असल्याचे पहिल्या आगाऊ अंदाजात नमूद केले आहे.."हे अंदाज मागील वर्षांच्या उत्पादनाचा कल, प्रत्यक्ष शेतपीक परिस्थितीची माहिती आणि प्रामुख्याने राज्यांकडून मिळालेल्या क्षेत्रीय निरीक्षणांवर आधारित आहेत. पीक कापणी प्रयोगांतून प्रत्यक्ष उत्पादनाची आकडेवारी मिळताच शेतमाल उत्पादनांच्या अंदाजात सुधारणा केली जाईल," असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.