Kharif Sowing: देशात खरिपाच्या पेरण्यांत २३ टक्क्यांची घट
Kharif Season: नैॡत्य मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन आणि संथ प्रगती यामुळे देशातील खरीप पेरणी मोठ्या प्रमाणावर मागे पडली आहे. २५ जूनअखेर खरीप पिकांची एकूण १८२.७२ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील २३६.४६ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ती सुमारे २३ टक्क्यांनी कमी आहे.