New Delhi News: भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारातील वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. या करारातून सोयापेंड, अन्नधान्य, तांदूळ, काही फळे आणि भाजीपाला, डेअरी तसेच पोल्ट्रीला वगळले आहे. मात्र या करारामुळे कापड, तयार कपडे, सागरी उत्पादने, रबर, चमड्याची उत्पादने, फर्निचर निर्यात शुल्कमुक्त होणार आहे. भारताने ऑलिव्ह तेल, प्रक्रियायुक्त अन्न आणि काही फळांवरील आयात शुल्क काढले आहे..भारत आणि युरोपियन युनियनदरम्यान जवळपास दोन दशकांपासून व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. अखेर मंगळवारी (ता.२७) या कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत..India EU FTA Benefit Maharashtra: भारत-युरोपियन युनियन करारामुळे शेतमाल निर्यातीला संधी- मुख्यमंत्री फडणवीस.यामुळे भारताच्या अनेक वस्तूंच्या युरोपियन युनियनमधील २७ देशांमध्ये शुल्कमुक्त निर्यातीला प्रोत्साहन मिळणार आहे. अमेरिकेने भारताच्या आयातीवर ५० टक्के शुल्क लागू केल्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे युरोपियन युनियनसोबतच मुक्त व्यापार करार दोन्ही बाजूंसाठी महत्त्वाचा ठरणार आहे..मुक्त व्यापार करारात भारतातून निर्यात होणाऱ्या ९३ टक्के वस्तूंवर युरोपियन युनियनमध्ये शुल्क लागू होणार नाही. तर ऑटोमोबाइल आणि स्टीलसह ६ टक्के वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले जाणार आहे आणि कोटा ठरवून युरोपियन युनियन आयात शुल्क लागू करणार आहे. मुक्त व्यापार करार लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून युरोपियन युनियन ९० टक्के वस्तूंवरील आयात शुल्क काढणार आहे..हा करार पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता आहे. तसेच ३ टक्के वस्तूंवरील आयात शुल्क पुढील ७ वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहे. भारताच्या ९९.५ टक्के वस्तूंना या करारातून आयात शुल्कात सवलत मिळणार आहे. सध्या भारताच्या वस्तूंवर युरोपियन युनियनमध्ये शून्य ते २६ टक्के आयात शुल्क लागू होते..भारत युरोपियन युनियनच्या ९३ टक्के वस्तूंची पुढील १० वर्षांच्या काळात शुल्कमुक्त आयात करणार आहे. मुक्त व्यापार करार लागू झाल्यापासून भारत केवळ ३० टक्के वस्तूंच्या आयातीवरील शुल्क काढणार आहे. तसेच युरोपियन युनियनच्या ३.७ टक्के वस्तूंची आयात शुल्कात सवलत आणि कोटा आधारित सवलत देणार आहे. एकंदरीत विचार करता या करारातून युरोपियन युनियनच्या ९७.५ टक्के व्यापाराला सवलत मिळणार आहे..मुक्त व्यापार करारात वस्तू आणि सेवांसह डिजिटल व्यापार, सॅनिटरी आणि फायटोसॅनिटरी मानक, व्यापारातील तांत्रिक अडथळे आणि बौद्धिक संपदा हक्कांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र सरकारी खरेदी, ऊर्जा आणि दुर्मीळ खनिजांचा समावेश करण्यात आलेला नाही. सध्या काही वस्तूंवर युरोपियन युनियनने कमी म्हणजे ३.८ टक्के शुल्क लावलेले आहे. ते आणखी कमी होणार आहे. तसेच काही वस्तू, जसे की सागरी उत्पादने, रसायने, प्लॅस्टिक आणि रबर यांच्यावर जास्त शुल्क आहे. पण आयात या करारामुळे आयात शुल्क काढले जाणार आहे..EU India FTA: भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराची तारीख ठरली, शेतीला वगळले.कापड निर्यातीला फायदामुक्त व्यापार करारामुळे भारताला कापडाची निर्यात युरोपियन युनियनच्या सर्व देशांमध्ये कोणत्याही शुल्काविना करता येणार आहे. तसेच तयार कपडे, सागरी उत्पादने, रबर, चमड्याची उत्पादने, पादत्राणे, फर्निचर, रसायने, प्लॅस्टिक, हिरे आणि दागिने, खेळणी, खेळाच्या वस्तू तसेच बेस मेटलच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही. त्यामुळे या वस्तूंची भारतातून निर्यातवाढीला मदत होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले..द्वीपक्षीय व्यापार भारत आणि युरोपियन युनियनमध्ये द्वीपक्षीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. २०२४-२५ मध्ये १३ हजार ६५३ कोटी डाॅलरचा द्वीपक्षीय व्यापार झाला होता. भारताने ७ हजार ५८५ कोटी डाॅलरची निर्यात केली तर ६ हजार ६८ कोटी डाॅलरची युरोपियन युनियनमधून आयात केली होती. भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल १७ टक्के निर्यात युरोपियन देशांना होते. युरोपियन युनियनमधील स्पेन, जर्मनी, बेल्जियम, पोलंड आणि नेदर्लंड हे निर्यातीच्या दृष्टीने महत्वाचे देश आहेत. तर युरोपियन युनियनच्या एकूण निर्यातीपैकी भारतात ९ टक्के आयात होते. .शेती, पोल्ट्री आणि डेअरी वगळली मुक्त व्यापार करारातून डेअरीसह शेतीला वगळण्यात आले आहे. भारत डेअरी, सोयापेंड आणि अन्नधान्य आयातीवरील शुल्क कमी करणार नाही. तर युरोपियन युनियनही तांदूळ, साखर, मांस आणि मटण तसेच पोल्ट्री आयातीवर शुल्क कायम ठेवणार आहे. मात्र भारताच्या ताज्या द्राक्षाच्या आयातीला कोट्यानुसार आयात शुल्कात सवलत मिळणार आहे. भारताच्या ८५ हजार टन द्राक्ष निर्यातीवर शुल्क लागू होणार नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. .तसेच भारत वाइन, बिअर, ऑलिव्ह तेल, प्रक्रियायुक्त अन्न आणि काही फळांच्या आयात शुल्कात कपात करणार आहे. बिअर आयातीवरील शुल्क ११० टक्क्यांवरून ५० टक्के, ऑलिव्ह तेलावरील शुल्क ४५ टक्क्यांवरून शून्य, किवी आणि पिअर आयात शुल्क ५५ टक्क्यांवरून शून्य, प्रक्रियायुक्त अन्न जसे की ब्रेड्स, पेस्ट्रीज्, बिस्कीट्स, पास्ता, चोकोलेट आणि पाळीव प्राणी अन्न आयातीवरील शुल्क ५० टक्क्यांवरून शून्य, तसेच मेंढीच्या मटणावरील आयात शुल्कही ३३ टक्क्यांवरून शून्य केले जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.