Government Cuts Edible Oil Import Duty: देशात खाद्यतेलाचे भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केली आहे. सोयातेल आणि पाम तेल शुल्कात ५ टक्के, तर सूर्यफुल तेल आयात शुल्कात १० टक्के कपात करण्यात आली आहे. यामुळे देशात आयात वाढण्याची शक्यता आहे. भारताची मागणी वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात दरवाढीला आधार मिळू शकतो, असा अंदाज खाद्यतेल बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. भारत गरजेच्या ६० टक्के खाद्यतेल आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारात वाढलेल्या दरवाढीमुळे देशातही खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत..Edible Oil Imports: आत्मनिर्भर की आयातजीवी?.मागील वर्षभरात देशातील खाद्यतेलाच्या भावात २० टक्के वाढ झाली. जागतिक पातळीवर ‘एल निनो’चा फटका खाद्यतेल उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. तसेच खाद्यतेलाचा वापर जैवइंधनासाठी वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच देशात दसरा आणि दिवाळी सणामुळे खाद्यतेलाची मागणी वाढत आहे. ही दरवाढ लक्षात घेऊन खाद्यतेलाचे भाव कमी राहावेत, यासाठी सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात केली आहे..केंद्र सरकारने बुधवारी (ता. २३) अधिसूचना काढत पामतेल, सोयातेल आणि सूर्यफूल तेल आयात शुल्कात कपात केली. कच्च्या आणि रिफाईंड अशा दोन्ही प्रकारच्या तेल आयातीवरील शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे भारतात खाद्यतेलाला मागणी वाढून आयातही वाढू शकते. परिणामी, भारताच्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल आणि सोयातेलाच्या भावात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे..Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात.कमी झालेले शुल्ककेंद्र सरकारने कच्चे आणि रिफाईंड सोयातेल तसेच पाम तेलाच्या मूलभूत आयात शुल्कात ५ टक्के कपात केली आहे. कच्चे पाम तेल आणि सोयातेल आयातीवरील मूलभूत शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आले आहे. मूलभूत शुल्कासह आयातीवर कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आणि सामाजिक कल्याण अधिभारही लागत असतो. या सर्व शुल्कासह कच्चे सोयातेल आणि पामतेल आयातीवर ११ टक्के शुल्क लागू होणार आहे. रिफाइंड सोयातेल आणि पाम तेल आयात शुल्कही ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे..सूर्यफूल तेलावर कमी शुल्कसरकारने सूर्यफूल तेल आयात शुल्कात जास्त कपात केली आहे. कच्या सूर्यफूल तेल आयातीवरील शुल्क १० टक्क्यांवरून शून्य करण्यात आले आहे. त्यामुळे कच्च्या सूर्यफूल तेलावर केवळ कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर आणि सामाजिक कल्याण अधिभारासह ५.५ टक्के शुल्क लागू होणार आहे. तर रिफाइंड सूर्यफूल तेल आयातीवरील शुल्कही १० टक्क्यांनी कमी करून २२.५ टक्के करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.