India-Maldives Relation : संबंध बिघडले असतानाही भारताकडून मालदीवला मैत्रीचा हात, परराष्ट्र मंत्री जमीर यांनी मानले आभार

Maldives Foreign Minister thanks India : मालदीवमधील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे काही काळापासून मालदीव आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. यादरम्यान भारताने मालदीवला मैत्रीचा हात पुन्हा एकदा पुढे करताना साखर, गहू, तांदूळ, कांदा आणि अंडी यासह जीवनावश्यक वस्तूंच्या मर्यादित निर्यातीला परवानगी दिली.
India-Maldives Relation
India-Maldives RelationAgrowon

Pune News : मालदीवमधील चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले आहेत. यादरम्यान मालदीवला कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. यावरून मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी शनिवारी (ता.०५) भारत सरकारचे आभार मानले आहेत. तसेच भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जमीर यांनी आभार मानले.

भारताचे 'मनापासून आभार"

जमीर म्हणाले, 'मालदीवला कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल भारताचे 'मनापासून आभार". 'दोन देशातील आंतरराष्ट्रीय संबंध बिघडले असून भारताने हा निर्णय घेणे म्हणजे 'दीर्घकालीन मैत्रीचे प्रतीक आहे'. तसेच 'मालदीवच्या विनंतीवरून कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास भारत सरकारने परवानगी दिली आहे. ही परवानगी २०२४-२५ साठी देण्यात असून उभय देशांमधील दीर्घकालीन मैत्री, द्विपक्षीय व्यापार संबंध वाढवण्याची दृढ वचनबद्धता दर्शवतो', असेही जमीर यांनी म्हटले आहे. 

India-Maldives Relation
Urea Import : केंद्राने दिली राज्य सरकारांना युरिया आयात करण्याची परवानगी

मानव-केंद्रित विकासाला पाठिंबा

दरम्यान, वाढणाऱ्या महागाईचा दर नियंत्रणावरून केंद्र सरकारने निर्यात बंदीचे धोरण आखले होते. पण शेजारी देश प्रथम' धोरणांतर्गत भारताने मालदीवमध्ये तांदूळ, साखर आणि कांद्याची निर्यात सुरूच ठेवली आहे. यावरून मालदीवमधील मानव-केंद्रित विकासाला पाठिंबा देण्यासाठी भारत दृढ वचनबद्ध असल्याचे, मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी दिलेल्या निवेदनात गुरुवारी (ता.०४) म्हटले आहे. 

विदेश व्यापार महासंचालनालय

तर मालदीवमधील झपाट्याने वाढणाऱ्या बांधकाम उद्योगासाठी नदीतील वाळू आणि दगडाचा कोटा २५ टक्क्यांनी वाढवून तो १० लाख मेट्रिक टन करण्यात आला आहे. तसेच विदेश व्यापार महासंचालनालय (DGFT) अधिसूचनेनुसार अंडी, बटाटे, कांदा, साखर, तांदूळ, गव्हाचे पीठ आणि डाळ (डाळी) यांच्या कोट्यातही ५% वाढ करण्यात आली आहे. 

India-Maldives Relation
Solar Import : केंद्र सरकारने घातली सौर मॉड्यूल्सच्या आयातीवर पुन्हा बंदी

तांदूळ - १,२४,२१८ टन, गहू पीठ - १,०९,१६२ टन,  साखार - ६४, ४९४ टन,  बटाटे - २१,५१३ टन, कांदा - ३५,४४९ टन, डाळ - २२४.४८ टन आणि अंडी - ४२.७५ कोटी इत्यादी, वस्तूंच्या निर्यातीला २०२४-२५ दरम्यान सध्या किंवा भविष्यात कोणतेही निर्बंध किंवा प्रतिबंधातून सूट दिली जाईल.

या देशांना कांदा निर्यात

देशांतर्गत महागाईवर नियंत्रण ठेवताना केंद्र सरकाने निर्यात बंदीचे धोरण आखले होते. पण मित्र राष्ट्रांमधील अत्यावश्यक वस्तूंची नितांत गरज लक्षात घेऊन निर्यात सुरू ठवण्यात आली. केंद्र सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) मार्फत संयुक्त अरब अमिराती आणि बांगलादेशला ६४,४०० टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती. यामध्ये भूतान, बहरीन, मॉरिशस, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती (दुबई), या देशांना कांदा निर्यात करण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com