INDIA alliance : तारीख ठरली! इंडियाच्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे

Opposition Party Meeting: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे पुढची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली.
MVA Meeting
MVA Meeting Agrowon

MVA Meeting : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन संपताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपविरोधी इंडिया आघाडीच्या ३१ ऑगस्ट रोजी मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये होणाऱ्या बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे देण्यात आले आहे.

MVA Meeting
Pik Vima : शेतकऱ्यांनी एक हजारांपेक्षा कमी नुकसान भरपाई मिळणार नाही, पीक विम्याची उर्वरित रक्कम सरकार देणार ; कृषिमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, जयंत पाटील, कपिल पाटील उपस्थित होते. या महाविकास आघाडीच्य बैठकीत इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या नियोजनासंदर्भात आणि राज्यातील राजकीय घडामोडींसदर्भात चर्चा झाली.

इंडिया आघाडीची तिसरी पाटणा, बेंगळुरूनंतर तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. ही बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीला देशातील सर्वच विरोधी पक्षांचे प्रमुख नेते एकत्र येत आहेत. त्यामध्ये, ५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश होणार आहे. तसेच, या बैठकीचे यजमानपद शिवसेनेला देण्यात आले असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नेतेही आमचे सहकारी असणार आहेत, असेही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com