Indian AI Models Transforming African Agriculture: शेतीची माहिती देणारे गुगलचे जे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेल्स प्रथम भारतासाठी तयार करण्यात आले, ते आता इतर देशांतही वापरले जात आहेत. सुरुवातीला भारतातील शेतजमिनीची माहिती नोंदविणारे हे मॉडेल्स गेल्या वर्षी आशिया-प्रशांत भागातील देशांत नेण्यात आले आणि अलीकडेच केनिया, युगांडा, घाना, रवांडा, नायजेरिया व झांबिया या सहा आफ्रिकी देशांची शेतीविषयक माहिती देऊ लागले आहेत, असे गुगलच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे..गुगल डीपमाइंडमधील कृषी व शाश्वतता संशोधन विभागाचे प्रमुख आलोक तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या अँथ्रोकृषी गटाने ही दोन मॉडेल विकसित केली आहेत. त्यातील अॅग्रिकल्चरल लँडस्केप अंडरस्टँडिंग (ALU) हे शेताच्या पातळीवर जमिनीची माहिती देते, तर अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन (AMED) हे शेतात होणारे बदल व घडामोडी टिपते..Google DeepMind AI Models: उपग्रहाद्वारे शेतीतील बदलांवर ‘डीपमाइंड’ची नजर.भारतातील वापरतेलंगणा सरकारने ही दोन्ही मॉडेल्स आपल्या अॅग्रिकल्चर डेटा एक्स्चेंजमध्ये (ADeX) जोडली असून, त्याचा ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. नापंता या ना-नफा संस्थांच्या गटाने ‘एएमईडी’चा वापर करून पूर्वसूचना देणारे व पिकावरील ताण ओळखणारे अॅप तयार केले आहे. कर्नाटकाच्या जलसंपदा माहिती प्रणालीने (KWRIS) या मॉडेलसोबत हवामान व उपग्रह माहिती जोडून २६ लाख हेक्टर सिंचित क्षेत्राचे व्यवस्थापन केले आहे..टेरास्टॅक या कंपनीने या मॉडेलच्या आधारे जमिनीच्या नोंदी, उपग्रह छायाचित्रे, पिकांची स्थिती, हवामानाचे संकेत व बाजाराची माहिती एकत्र करणारा प्लॅटफॉर्म उभारला आहे. त्यावर १४ कोटी हेक्टरहून अधिक, म्हणजे भारतातील जवळपास संपूर्ण लागवडीखालील क्षेत्राची माहिती आहे. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना कर्ज व हवामानविषयक मदत मिळविण्यासाठी होतो, असे गुगलचे म्हणणे आहे..Google DeepMind Agriculture : गुगल डीपमाइंडच्या एआय मॉडेल्सचा शेतीसाठी वापर.भात व कार्बन क्रेडिटकार्बनफार्म ही संस्था ‘एएलयू’ व जेमिनीचा वापर करून भात लागवडीच्या पद्धतींवर लक्ष ठेवते. सध्या १२ देशांत सुरू असलेले हे काम २० देशांत नेण्याची आणि २०३० पर्यंत २० लाख हेक्टरवरील कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या भात लागवडीला आधार देण्याची योजना आहे..संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) उपक्रमांतर्गत ही मॉडेल्स क्रॉपग्रिड्स या जागतिक माहिती प्लॅटफॉर्मवर जोडण्याची योजना आहे. यासाठी गुगल डॉट ऑर्गने २५ लाख डॉलर्सचे अर्थसाह्य दिले आहे. जगात २०२५ मध्ये सुमारे २.१ अब्ज लोकांना पुरेसे अन्न मिळाले नाही, तर २०५० पर्यंतची ९७० कोटी लोकसंख्या पोसण्यासाठी जागतिक अन्न उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत वाढवावे लागेल, असे गुगलने नमूद केले आहे..‘एएलयू’ आणि ‘एएमईडी’ म्हणजे काय?ही गुगल डीपमाइंडने विकसित केलेली दोन एआय मॉडेल्स आहेत. अॅग्रिकल्चरल लँडस्केप अंडरस्टँडिंग (‘एएलयू’) हे शेताच्या पातळीवर जमिनीची माहिती तयार करते, म्हणजे शेताच्या हद्दी व जमिनीचा वापर कसा आहे हे ओळखते. अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन (‘एएमईडी’) हे शेतात घडणारे बदल टिपते. ही माहिती इतर संस्थांना एपीआयद्वारे वापरता येते.(माहिती स्रोत : गुगल इंडिया ब्लॉग, २६ ऑगस्ट २०२६).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.