भारताकडून ३० लाख कोटी माल निर्यातीचे लक्ष्य साध्य : मोदी

अर्थव्यवस्थेपेक्षाही आपल्या देशाचे वाढते सामर्थ्य आणि क्षमता यांच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २७) आनंद व्यक्त केला.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

नवी दिल्ली - भारताने ४०० दशलक्ष डॉलर म्हणजेच ३० लाख कोटी रुपयांच्या मालाच्या निर्यातीचे विक्रमी लक्ष्य साध्य केले, हे अर्थव्यवस्थेपेक्षाही(Economy) आपल्या देशाचे वाढते सामर्थ्य आणि क्षमता यांच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (ता. २७) आनंद व्यक्त केला.

आकाशवाणीवरील ‘मन की बात’( Man Ki Baat) कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान(PM) म्हणाले, की महात्मा फुले,(Mahatma Phule) सावित्रीबाई फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जीवनाशी निगडित स्थळांना अवश्य भेटी द्याव्यात. त्यामुळे आपल्यालाही खूप काही शिकता येते. येणाऱ्या पावसाळ्यात जलसंवर्धन, जलसंरक्षण ही लोकचळवळ बनली पाहिजे याचाही पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एप्रिल महिन्यात येणाऱ्या, डॉ. आंबेडकर जयंती, तसेच रामनवमीसह विविध सण आणि उत्सवांनिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. ‘मन की बात’( Man Ki Baat) या कार्यक्रमाचा आजचा ८७ वा भाग होता.

Narendra Modi
शेतमालाची निर्यात २५ टक्क्यांच्या वाढीसह ४० अब्ज डॉलर्सवर

निर्यातीचा ऐतिहासिक टप्पा गाठणे याचा अर्थ भारतीय वस्तूंची मागणी संपूर्ण जगभरात (World) वाढत आहे, असे सांगून मोदी म्हणाले, की भारताची पुरवठा साखळी म्हणजेच ‘सप्लाय चेन’ दिवसेंदिवस मजबूत होत आहे, हाही यातून एक संदेश मिळतो. कधी काळी भारतीय निर्यातीचा आकडा १००, १५०, २०० दशलक्ष डॉलरच्या आसपास थांबत असे, त्याने आता ४०० दशलक्ष डॉलरची झेप घेतली आहे. हे एका रात्रीत झालेले नाही. जेव्हा संकल्प प्रयत्नांच्याही पुढे जातात तेव्हा यश आपोआप चालत येते. देश सामूहिकरीत्या जेव्हा रात्रंदिवस आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा हे संकल्प सिद्ध होतात. व्यक्तिगत जीवनामध्येही हाच अनुभव येतो.

उस्मानाबादची हँडलूम उत्पादने, लडाखचा प्रसिद्ध अप्रिकॉट, आसाममधील चामड्याची उत्पादने, बिजापूरची फळे आणि भाजीपाला, चंदोलीचा ब्लॅक राइस अशा कितीतरी उत्पादनांना(Product) जगभरातून वाढती मागणी येत आहे. आता ॲप्रिकॉट दुबईतही मिळतो आणि तमिळनाडूची केळी अरबी देशांमध्ये मिळू लागतात. भारतीय उत्पादनांची ही यादी जेवढी मोठी आहे तेवढीच मोठी ताकद ‘मेक इन इंडिया’ची आहे. शेतकरी,(Farmer) आमचे कारागीर, आमचे विणकर आमचे अभियंते, आमचे लघुउद्योजक, आमचा सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाचा वर्ग यासारखे अनेक जण देशाची खरी ताकद आहेत, असे आवाहन त्यांनी केले.

आयुष उद्योगांची बाजारपेठही (Market) विस्तारत
पंतप्रधान मोदी म्हणाले, की स्टार्टअपच्या जगात आयुष उत्पादने हे एक आकर्षण ठरत आहे. यातील स्टार्टअप Start - Up) उद्योजकांनी ऑनलाइन पोर्टल(Online Portal) तयार करतानाच संयुक्त राष्ट्राच्या मान्यताप्राप्त सर्व भाषांमध्ये माहिती जरूर द्यावी, असेही पंतप्रधान म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com