Talathi Protest : तलाठ्यांकडून मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन

तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाप्रशासनाला वारंवार विनंती केली, निवेदने दिली.
Talathi Office
Talathi OfficeAgrowon

Solapur News : तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांची रखडलेली पदोन्नती त्वरित करावी, ई-चावडीबाबत तलाठ्यांना प्रशिक्षण नाही, लॅपटॅाप दिला, पण प्रिंटर-स्कॅनर दिला नाही यासारख्या अनेक मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुमारे ५०० तलाठी आणि ९४ मंडल अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन (Talathi Proses) सुरू केले आहे.

तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाप्रशासनाला वारंवार विनंती केली, निवेदने दिली.

मात्र आमच्या मागण्यांकडे गेल्या दोन वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याने शेवटी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घ्यावा लागला, असे तलाठी संघाचे अध्यक्ष राजकुमार पांडेकर यांनी सांगितले.

तसेच जोपर्यंत मागण्यांबाबत विचार होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले. ई-चावडीच्या कामकाजाबाबत तलाठी यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले नाही.

Talathi Office
Farmer Hunger Strike : तिवसा येथे शेतकऱ्यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

तलाठी व मंडळ अधिकारी यांचे मासिक वेतन तीन तारखेपर्यंत करण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात यावी, मेगा डेटाचे कामकाज तलाठी तहसील कार्यालयातून रेकॅार्डिंग स्कॅनिंगची तपासणी करून प्रमाणपत्र देणेबाबत तगादा लावला जात आहे, हे कामकाज अधिकाऱ्याकडून करून घेण्यात यावे, बहिष्कार टाकून विनम्रपणे काम नाकारत आहे. असेही पांडेकर यांनी सांगितले.

...या आहेत प्रमुख मागण्या

१) तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी.

२) शासनाच्या जीआरप्रमाणे जिल्ह्यांतर्गत उपविभाग बदलीपात्र तलाठ्यांची बदली करण्यात यावी.

३) सब रजिस्टर कार्यालयामार्फत तलाठी यांच्याकडील नोंद चुकीच्या येतात, दस्तप्रमाणे नोंदी काही वेळेस येत नाहीत, चुकीच्या नोंदी रद्द करण्याची सुविधा मिळावी.

४) ई-पीकपाहणी करण्याबाबत शासनाने परिपत्रक काढले आहे, तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी योजनेचा प्रसार व जाहिरात करावी.

पीएम किसान योजनेचे कामकाज तलाठी यांनी पूर्ण केले आहे, ही योजना कृषी विभागाकडे हस्तांतरित करावी व तसे आदेश जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना द्यावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com