Farmers Protest
Farmers ProtestAgrowon

Hunger Strike : शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सावरगाव येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

Farmers Protest : चिखली विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे रक्ताने लिहिलेले मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना बुलडाणा येथे देण्यासाठी आणण्यात आले होते.
Published on

Buldana News : चिखली विधानसभा मतदारसंघातील सुमारे तीन हजार शेतकऱ्यांचे रक्ताने लिहिलेले मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना बुलडाणा येथे देण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी हे निवेदन फाडून टाकले.

या प्रकरणी गृहमंत्र्यांनी माफी मागावी, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी सोमवार (ता.२३)पासून चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथे माजी आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात अन्नत्याग आंदोलन छेडण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे.

Farmers Protest
Farmers' Protest : विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पाठिंबा किंवा विरोध नाही, पण...; हरियानातील महापंचायतीत शेतकऱ्यांचा निर्णय

गृहमंत्री व पोलिस प्रशासनाने केलेल्या शेतकरी विरोधी कृत्यासाठी माफी मागेपर्यंत हे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, असे बोंद्रे यांनी सांगितले.

Farmers Protest
MP Farmer Protest On soybean : मध्य प्रदेशमधील सोयाबीन आंदोलनात राकेश टिकैत यांची एंट्री; थेट कृषिमंत्री चौहान यांना आव्हान?

सोयाबीनला ७ हजार रुपये भाव, थकलेला पीकविमा, शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन अनुदानाचा अनुशेष, शेतकऱ्यांना दिवसा सलग १२ तास वीज, वन्य प्राण्यांपासून संरक्षण या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना बुलडाणा दौऱ्यादरम्यान गुरुवारी (ता.१९) देण्याचे ठरवले होते.

मात्र निवेदन देण्यासाठी शेतकरी गेले असता त्यांच्या मागण्यांवर चर्चा तर नाहीच, उलट पोलिस प्रशासनाकडून निवेदन फाडून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला असल्याचे बोंद्रे यांचा आरोप आहे. त्यामुळे चिखली तालुक्यातील आदर्श गाव सावरगाव डुकरे येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com