Water Sources : पाण्याचे स्रोत बळकट करून वाढविले चाराक्षेत्र

Dr. Vilas Atkare : विहिरीला पर्याप्त जलस्त्रोत नसल्याने त्यातून जेमतेम पाण्याचा उपसा होत होता. ही बाब हेरत नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गंत असलेल्या डेअरी विभागाचे प्रमुख डॉ. विलास अतकरे यांनी भुगर्भात जलसंचय वाढावा याकरीता स्वखर्चातूनच शेततळ्याची उभारणी केली.
Water Source
Water SourceAgrowon

Nagpur News : विहिरीला पर्याप्त जलस्त्रोत नसल्याने त्यातून जेमतेम पाण्याचा उपसा होत होता. ही बाब हेरत नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गंत असलेल्या डेअरी विभागाचे प्रमुख डॉ. विलास अतकरे यांनी भुगर्भात जलसंचय वाढावा याकरीता स्वखर्चातूनच शेततळ्याची उभारणी केली.

त्यामुळे विहिरीच्याही पातळीत आणि पाणी उपसा कालावधीत वाढ झाली. या पाण्याचा उपयोग करून चारा लागवड क्षेत्राचाही विस्तार करण्यात आला आहे. इच्छाशक्‍ती आणि सामाजिक संवेदना असल्या तर शासकीय सेवेतही समाधानी कार्याची अनुभूती मिळविता येते याचा आदर्शच डॉ. अतकरे यांनी घालून दिला आहे.

Water Source
Crop Loan Recovery : दुष्काळग्रस्त भागात पीक कर्ज वसुली थांबणार

नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गत डेअरी विभागाचे ते प्रमुख आहेत. या ठिकाणी १६ गायींचे संगोपन होते. त्यांच्या माध्यमातून पूर्वी केवळ १८ लिटर दूधाचे संकलन होत होते. योग्य चारा व्यवस्थापनाच्या बळावर हे संकलन ५६ लिटरवर नेण्यात डॉ. अतकरे यशस्वी झाले आहेत.

Water Source
Water Sources : लोकसहभागातून ३२५७ पेक्षा अधिक जलस्रोतांची स्वच्छता

डेअरी विभाग असलेल्या भागातून दिड किलोमीटर नाला गेलेला आहे. याच नाल्यानजीक त्यांनी स्वखर्चातून ३० बाय ५४ मिटर आकाराचे शेततळे उभारले. या शेततळ्याची पाणी साठवण क्षमता ३० लाख दलघमी आहे.

पाण्याच्या उपलब्धतेमुळे या क्षेत्राचा विस्तार एक हेक्‍टरपर्यंत करता आला आहे. एवढ्यावरच न थांबता डॉ. अतकरे यांनी पोल्ट्री, शेळीपालन या व्यावसायिक उपक्रमांनाही सुरुवात केली आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com