Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

Soybean Vegetable : सोयाबीनला जेव्हा शेंगा लागून दाणे फुगतात. त्या वेळी त्या हिरव्या शेंगा सोलून त्यातील कोवळ्या सोयाबीन दाण्यांची भाजी अतिशय रुचकर लागते.
Green Soybean
Green Soybean Agrowon
Published on
Updated on

Soybean in Human Diet : सोयाबीनची भाजी म्हटले की सोया चंक्स शिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी अवलंबला जात नाही. सोया चंक्स म्हणजे तेल काढून उरलेले बायप्रॉडक्ट्स. काही नामांकित ब्रँड सोया चंक्स बाजारात १५० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत. सोयाबीनचे परिपक्व होऊन तयार झालेले दाणे त्याच्या थोड्याफार उग्र चवीमुळे भाजी करून खाण्यायोग्य नसतात.

Green Soybean
Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

परंतु सोयाबीनला जेव्हा शेंगा लागून दाणे फुगतात. त्या वेळी त्या हिरव्या शेंगा सोलून त्यातील कोवळ्या सोयाबीन दाण्यांची भाजी अतिशय रुचकर लागते. खरे तर त्याच्या अनेक रेसिपीज होऊ शकतात. काही शेतकरी अशा पद्धतीने कोवळ्या सोयाबीनची भाजी करतात. मात्र या गोष्टीचा तितकासा प्रसार-प्रचार अजूनही झालेला दिसत नाही.

Green Soybean
Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

सोयाबीनला समाधानकारक बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक वर्गात सध्या निराशा आहेच. सोयाबीनवर प्रक्रिया केलेले अनेक पदार्थ बाजारात आहेत. मात्र त्यातून प्रक्रिया उद्योगांना चांगला नफा मिळतो. शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगा सरळ किचन मध्ये गेल्या तर परिस्थिती काहीशी सुधारू शकते.

ज्याप्रमाणे तुरीच्या शेंगा शिजवल्या जातात त्याप्रमाणे सोयाबीनच्या शेंगा शिजवून त्यातले दाणे मीठ मसाला लावून खाता येऊ शकतात. जशी आपण वालवर्गीय बियांची आमटी करतो. वाल किंवा पावट्याचे कालवण करतो, अगदी त्याच पद्धतीने हिरव्या सोयाबीनचे कालवण केले तर ते अतिशय चवदार लागते. सोयाबीन हिरवे असताना आकाराने मोठे असते. हिरवे सोयाबीन डीहायड्रेट करून वर्षभर वापरात येऊ शकते. सोयाबीनच्या हिरव्या शेंगा बाजारात दिसणे हे खूप गरजेचे आहे. यावर चर्चा अपेक्षित आहे.

शंकर बहिरट, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com