Vegetables In Market : देशी केळी, आंब्याची रेलचेल, टोमॅटो, दोडका, वांगीची आवक कमी

Mango Rate : आंब्यासाठी सरासरी दर ७०० ते १००० हजार रुपयांपर्यंत होता. याचबरोबर देशी केळांनाही चांगला दर मिळत आहे. डझनाचा भाव १०० रुपयांपर्यंत गेला आहे.
Vegetables In Market
Vegetables In Marketagrowon

Market Rate : शेवटच्या टप्प्यात आलेल्या आंबा हंगामाला चांगली मागणी आली आहे. कर्नाटकी बेंदुर आणि वटपोर्णिमेमुळे आंब्याची मोठी खरेदी होत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. चांगल्या आंब्यासाठी सरासरी दर ७०० ते १००० हजार रुपयांपर्यंत होता. याचबरोबर देशी केळांनाही चांगला दर मिळत आहे.

डझनाचा भाव १०० रुपयांपर्यंत गेला आहे. तर आठवडा बाजारात पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक कमी झाल्याने गर्दी कमी दिसत आहे. तर टोमॅटोच्या दरात मात्र वाढ होताना दिसत आहे.

प्रतिकिलो रुपये भाजीपाला

टोमॅटो - ५० ते ६०, दोडका - ६० ते ८०, वांगी - ७० ते ८०, कारली - ५० ते ६०, ढोबळी मिरची - ८० ते १००, मिरची - ८० ते ९०, फ्लॉवर - ७० ते ८०, कोबी - ३० ते ४०, बटाटा - ४० ते ५०, कांदा - ३५ ते ४०, लसूण - २०० ते २५०, आले - १२० ते १४०, लिंबू - १५० ते ५०० शेकडा, गाजर - ५० ते ६०, बीन्स - २२० ते २५०, गवार - ८० ते १००, भेंडी ५० ते ६०, काकडी - ५० ते ६०, दुधी - ३० ते ४०, पालेभाज्या - २० ते २५, कोथिंबीर - ४० ते ५०, मेथी - ३०, शेवगा - ८ ते १० रुपये नग.

फुले : झेंडू - १३० ते १५०, निशिगंध - १२० ते १५०, गुलाब - १८० ते २००, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १८० ते २००.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - १०० ते १२०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - १०० ते १२०, पेरू - ५० ते ८०, खजूर - १५० ते २००, पपई - ४० ते ५०, मोर आवळा - १०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज - ४० ते ६०, केळी - ६० ते ७० डझन, देशी केळी - ९० ते १०० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच - १०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर - ८० ते१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी - २८ते ३५, बार्शी शाळू - ३० ते ५३, गहू - ३३ ते ४२, हरभराडाळ - ८३ ते ८६, तुरडाळ - १६० ते १७८, मुगडाळ - ११५ ते १२०, मसूरडाळ - ८२ ते ९०, उडीदडाळ - १३० ते १४०, हरभरा - ७५ ते ७८, मूग - १२० ते १४०, मटकी - ११० ते १२०, मसूर - ७० ते ९० फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ११० ते १४०, हिरवा वाटाणा - ९० ते १००, छोला - १४० ते १६०.

भाजीपाल्याचे दर ''जैसे थे''

-भाजीपाला बाजारात कमी आवक आणि वाढलेल्या दराचे चित्र ''जैसे थे'' आहे

-भाज्यांची अवस्था फार बिकट असून मेथी, कोथिंबिरीची खरेदी ग्राहक काटकसरीने करत आहेत.

-शेपू, चाकवत, करडा, लालभाजी या हंगामी पालेभाज्या बाजारात अद्याप दिसेनासे झाल्या आहेत.

-देशी काकडीची आवक पूर्ण थांबली आहे.

-बटाटा, टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे.

-फूलबाजारात फुलांचे भाव हळूहळू टवटवीत होताना दिसत आहेत.

आठवडी बाजार सुनासुना

पावसाचे आगमन होऊनही वातावरणाचा परिणाम आठवडी बाजारातही दिसत नाही. भाजीपाल्याच्या स्थानिक आवकेला अद्याप जोर नाही. त्यामुळे बाजार समितीतही आवक कमी होत आहे. या दिवसात आठवडी बाजाराच्या निमित्ताने स्थानिक हंगामी भाजीपाला बाजारात लवकर येतो आणि आवक वाढत असते. मात्र, यंदा त्याला विलंब होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com