Birsa Munda Krishi Kranti Yojana : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील अनुदानात वाढ

Subsidy Increased : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीजजोडणी आदींसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Birsa Munda Krishi Kranti Yojana
Birsa Munda Krishi Kranti YojanaAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहिरी, शेततळे, वीजजोडणी आदींसाठी अनुदानात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

या योजनेत सिंचन विहिरींसाठी याआधी अडीच लाख रुपये देण्यात येत होते. आता वहिरींसाठी चार लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे

Birsa Munda Krishi Kranti Yojana
Farmers Scheme Fund: शेतकऱ्यांसाठीच्या ७ योजनांसाठी १४ हजार २३५ कोटींचा निधी मंजूर

इनवेल बोअरिंगसाठी २० हजारांवरून ४० हजार यंत्रसामग्रीसाठी ५० हजार रुपये, परसबागेकरिता पाच हजार रुपये अनुदान देण्यात येईल. नवीन विहिरींबाबत १२ मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे.

Birsa Munda Krishi Kranti Yojana
Farmers New Schemes : शेतकऱ्यांसाठी ७ नव्या योजना जाहीर;  केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी १४ हजार कोटींच्या योजना केल्या जाहीर

शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी सध्या एक लाख रुपये अनुदान देण्यात येते आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येईल. त्याच प्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या २५ हजार रुपये देण्यात येतात.

आता तुषार सिंचन संच ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के अनुदानापैकी जे कमी असे ते अनुदान देण्यात येईल. अशा प्रमाणे ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्क्यांपैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com