Coal Sale : दगडी कोळशाच्या विक्रीत तेजी

Coal Sale Update : डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुण वीट उद्योजक हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. याला लागणारा दगडी कोळशाची मागणी वाढली असून सध्या ठिकठिकाणी व्यापारी विकत आहेत.
Coal
Coal Agrowon

Mumbai News : हिवाळा सुरू होताच अनेक ठिकाणी व्यावसायिक वीट तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तरुण वीट उद्योजक हा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. याला लागणारा दगडी कोळशाची मागणी वाढली असून सध्या ठिकठिकाणी व्यापारी विकत आहेत.

विटा तयार करण्यासाठी मुबलक पाणी लागते. त्यामुळे नदी, नाल्याकिनारी हा व्यवसाय केला जातो. वीट तयार करण्यासाठी दगडी कोळसा, भाताचा तुस, चांगली लाल-काळी मातीची गरज भासते. त्या मातीसाठी महसूल विभागाकडे परवानगी घ्यावी लागते. यासाठी काही रक्कम भरावी लागते.

Coal
Coal Mining: प्रस्तावित कोळसा खाणीला पर्यावरण मंजुरी

विटा भाजण्यासाठी लागणारा खास दगडी कोळसा हा चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, विलासपूर या भागांतून आणला जातो. येथील व्यावसायिक तो विकत घेतात. दगडी कोळसा पुरवणारे व्यापारी उद्योजक सध्या चारोटी, मनोर या भागात दगडी कोळसा डेपो टाकून त्याची विक्री करत आहेत. चुरी म्हणजे बारीक कोळसा, रोडी थोडा मोठा कोळसा, स्टीम म्हणजे मोठा कोळसा असतो. सध्या ११ ते १२ हजार रुपये टन याचा भाव सुरू आहे.

सध्या वातावरण बेभरवशाचे झाले आहे. कधीही पाऊस पडतो. विटा तयार झाल्यावर कच्च्या विटा पावसात वितळून जातात. त्यामुळे वातावरणावर हा व्यवसाय अवलंबून आहे. फार कमी वीट व्यावसायिक सध्या या धंद्यात उतरत आहेत. अनेकांनी हा व्यवसाय सोडून अन्य कामे सुरू केलीत. त्यात सध्या अत्याधुनिक सिमेंटच्या तसेच राखेच्या विटा मोठ्या प्रमाणात बनवल्या जातात.

Coal
Coal Energy : ऊर्जेसाठी सरकारला हवी कोळशाची ब्लॅक पॉवर

यासाठी अत्याधुनिक राख व इतर साहित्य वापरले जाते. त्या विटांची किंमत मातीच्या विटांपेक्षा कमी असते. अद्ययावत मशीनद्वारे त्या केल्या जात असल्याने स्वस्त असतात. त्यामुळे त्याला मागणी आहे. मातीच्या पारंपरिक विटा अजूनही वापरतात. या विटांच्या घरात थंडावा राहतो. त्या टिकाऊसुद्धा असतात; पण सिमेंट विटापेक्षा महाग असतात. त्यातच विटा करणाऱ्या कुशल कारागिरांची सध्या कमतरता आहे.

सध्या वातावरणात कधीही बदल होतो. कधीही पाऊस पडत असल्याने हा व्यवसाय बेभरवशाचा आहे. तरीही पारंपरिक व्यवसाय असल्याने आम्ही करत आहोत. सध्या मोठ्या प्रमाणात मातीच्या विटेला मागणी नाही. अजूनही हा व्यवसाय करत आहोत.
राकेश शिंदे, वीट व्यावसायिक
अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्यात वीट व्यवसायिकांना लागणारा कोळसा पुरवतो. यासाठी चंद्रपूर, गडचिरोली, विलासपूर, नागपूर या भागांतून तो मागवतो. इंधनाचे भाव वाढल्याने वाहतूक खर्च वाढल्याने दगडी कोळशाचा भावही वाढला आहे.
प्रवीण सिंग, कोरडीमल, दगडी कोळसा व्यापारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com