Sugarcane Cutting Labourer
Sugarcane Cutting LabourerAgrowon

Sugarcane Cutting : ऊस तोडणीमुळे वाढ्यांना मागणी ; देवणी तालुक्यातील चित्र, पशुपालकांना दिलासा

Sugarcane Season : देवणी तालुक्यासह सीमावर्ती भागातील गळीत हंगामाला गती आल्याने पशुधनासाठीच्या उसाचे वाढे उपलब्ध होऊ लागले आहेत. सध्या उसाच्या वाढ्यांना पशुपालकांकडून चांगली मागणी आहे.
Published on

Devani News : देवणी : तालुक्यासह सीमावर्ती भागातील गळीत हंगामाला गती आल्याने पशुधनासाठीच्या उसाचे वाढे उपलब्ध होऊ लागले आहेत. सध्या उसाच्या वाढ्यांना पशुपालकांकडून चांगली मागणी आहे. विशेषतः दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, पशुपालक मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्याची खरेदी करत आहेत.
 

सीमावर्ती भागातील देवणी तालुका हा हलकी व मुरमाड जमीन असलेला भूभाग आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेकांनी पशुपालनाला प्राधान्य दिले. दुग्ध व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गावागावांत पशुधनाची संख्या वाढली. वाढलेल्या पशुधनाच्या गरजेमुळे चारावर्गीय पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढले.

Sugarcane Cutting Labourer
Sugarcane Cutting labourer : ऊस तोडणीसाठी मजुरांसोबत विद्यार्थ्यांचेही स्थलांतर

त्यातही उसाच्या वाढ्याचा चारा म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात वापर करतात. नोव्हेंबर महिन्यापासून तालुक्यातील ऊस तोडणीच्या कामाला वेग आला आहे. शेतशिवारात ऊसतोडीची लगबग वाढली आहे. पावसाळ्यात शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्यासह हलक्या जमिनीवरील गवताचा आधार होता. मात्र, सध्या अन्य हिरव्या चाऱ्याची टंचाई असल्याने उसाच्या वाढ्यावरच पशुधनाची भूक भागवली जात आहे.

हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाल्यास दुग्धोत्पादनात वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे शेतकरी मिळेल त्या भावात हिरवा चारा विकत घेताता. सध्या उसाच्या वाढ्याची खरेदी करून चाऱ्याचा प्रश्न सोडवत आहेत. उसाचे वाढे स्थानिक मजुरांकडून पाच ते दहा रुपयाला प्रतिपेंडी विक्री होत आहे. पेंढी मोठी असल्यास दरात काही प्रमाणात वाढ होताना दिसते.

गेली दोन दशकांत तालुक्यात सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. मांजरा नदीचा परिसर आता ऊस उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जात आहे. ऊस वाढ्याचा चारा म्हणून ग्रामीण भागात वापर वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com