Sangli Agriculture Fund News: जिल्ह्यातील शेतीचे क्षेत्र व शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता कृषी समितीसाठी स्वीय निधीतून तरतूद करण्यात आलेला निधी अत्यल्प आहे. यात भरीव वाढ करावी, असा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या पहिल्याच सभेत करण्यात आला..कृषी समितीची सभा सभापती सावित्री रविपाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभापती दालनात पार पडली. यावेळी समिती सदस्य उदयसिंह पाटील, शिवाजी खिलारे, सम्राटसिंह नाईक, मोहिनी खोत, अर्चना पाटील, वर्षा जाधव, संध्या पाटील, वैशाली मुळीक यांच्यासह समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी मनोजकुमार वेताळ व अधिकारी उपस्थित होते. २०२६-२७ साठी वित्त विभागाकडून कृषी विभागासाठी स्वीय निधीमधून जिल्ह्यातील शेतकरी संख्येच्या प्रमाणात पुरेशी तरतूद केली नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. कृषी विभागासाठीची वित्तीय तरतूद वाढवून मिळण्यासाठी वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २०२५-२६ मध्ये कृषी विभाग जिल्हा परिषद स्वीय निधीमधून करण्यात आलेल्या विविध घटकांवरील खर्चास चर्चेअंती समितीने मान्यता दिली..Rain Damage Relief Fund: नुकसानीच्या मदतीपोटी ५३ कोटी रुपयांचे वितरण.जिल्हा परिषद कृषी विभागाकडील अनेक योजना २०१४ नंतर राज्य शासनाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. त्या पूर्ववत जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी भूमिका सदस्यांनी व्यक्त केली. तसा ठराव सभेत करण्यात आला. तो राज्य शासनाकडे सादर करण्याचा निर्णय झाला, तसे आदेश सभापती सौ. पाटील यांनी दिले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला उत्पादन गटस्थापना योजना, हुमणीमुक्त गाव मोहीम आणि विविध कृषी पुरस्कार योजना कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले..Bhausaheb Fundkar Scheme: भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी आणखी ४३ कोटींचा निधी मंजूर.शीतगृहे, गोदाम बांधण्याचा प्रस्तावजिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या उपलब्ध जागांवर शीतगृह आणि गोदाम बांधून शेतकऱ्यांना नाममात्र भाडे आकारून वापरासाठी देण्यबाबत सभेत सदस्यांनी चर्चा केली. त्यानुसार पुढील समिती सभेत प्रस्ताव सादर करावा, असे आदेश देण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.