Agriculture Business : शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नाची जोखीम कमी होईल

Dr. Dattaprasad Waskar : शेतीपूरक दुग्धव्यवसाय, शेळीपालन, गांडुळ खत निर्मिती आदी व्यवसायातून उत्पन्नाची जोखीम कमी करता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.
Dr. Dattaprasad Waskar
Dr. Dattaprasad WaskarAgrowon

Parbhani News : पारंपारिक पीक पद्धती सोबत फळे, भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्यास अधिक नफा मिळविणे शक्य होईल. शेतीपूरक दुग्धव्यवसाय, शेळीपालन, गांडुळ खत निर्मिती आदी व्यवसायातून उत्पन्नाची जोखीम कमी करता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्थेच्या प्रकल्पांतर्गत हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रम या योजनेतून बाभूळगाव (ता. परभणी) येथे सोमवारी (ता. १२)) आयोजित एक दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

Dr. Dattaprasad Waskar
Agriculture Business : शेती उद्योगात राजकारण न आणता एकत्र या : पवार

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषी अभियांत्रिकी) डॉ. मदन पेंडके,

वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. आनंद गोरे, डॉ. आर. एस. राऊत, वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. जी. आर. हनवते, सहाय्यक प्राध्यापक (मृदशास्त्र)डॉ. पी. एच. गौरखेडे यांची उपस्थिती होती.

दौलत चव्हाण म्हणाले, की कृषी विभागाचे विविध योजनांचा लाभ घ्यावा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे व शेतकरी सहल यासाठी विभागाशी संपर्क साधावा.

डॉ. नारखेडे म्हणाले, की कोरडवाहू शेतीमध्ये मूलस्थानी जल व्यवस्थापनासाठी रुंद वरंबा सरी पध्दतीचा अवलंब करावा. सोयाबीन, कापूस, तूर लागवड रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाने करावी.

Dr. Dattaprasad Waskar
Agriculture Business : शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य

हवामान बदलानुरुप विद्यापीठांनी विकसित केलेले सोयाबीन वाण एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-१६२, एमएयुएस-७२५, तूर बीडीएन-७११, बीडीएन-७१६,

बीडीएन-२०१३-४१, रब्बी ज्वारी वाण परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती, करडई मध्ये पीबीएनएस-१२,४०, पूर्णा या जातीचा अधिक उत्पादनासाठी अवलंब करावा.

शेतीमध्ये शेणखताबरोबर शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रेचा वापर करुन जमिनीची सुपीकता टिकवावी. डॉ. पेंडके यांनी विहीर व कूपननलिका पुनर्भरण, शेततळे याविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.

डॉ. गोरे म्हणाले, की कोरडवाहू शेतीमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आणि सेंद्रिय शेती या बाबींवर भर द्यावा. कार्यक्रमात कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. सोन्ना येथील शेतकरी आवडाजी गमे यांनी मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com