Maharashtra Cabinet Meeting : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Natural Disaster : सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत (State Cabinet meeting) घेण्यात आला. बुधवारी (ता.५) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला. सततचा पाऊस निश्चित करण्यासाठी काही निकष तयार करण्यात आले आहेत.

नव्या निकषानुसार कुठेही ५ दिवस सलग किमान १० मिलीमीटर पाऊस झाला तर संबंधित ठिकाणी नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाणार आहे.

आतापर्यंत एखाद्या ठिकाणी ६५ मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला वा गारपीट वा पाऊसच पडला नाही तर आपत्ति समजली जात होती. परंतु या निकषामध्ये बदल करण्यात आला आहे.

Crop Damage
CM Uddhav Thackeray resigns:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा राजीनामा; महाविकास आघाडी सरकार कोसळले

सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. हातातोंडाशी आलेले पीक वाया जाते. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची अपेक्षा असते.

परंतु मदत देताना निकषानुसार केली जाते. त्यामुळे राज्य सरकारने सतत पडणाऱ्या पावसाळा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलत्या हवामानाचा फटका (Climate Change)शेतकऱ्यांना बसतो आहे. वादळी पाऊस, गारपीटने शेतकऱ्याचे नुकसान होते आहे. त्यातून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मंत्री सुधीर मुंगटीवार म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

(मदत व पुनर्वसन)

ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद

(महसूल विभाग)

• नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार

(नगर विकास-१)

• देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल

(नगर विकास-१)

• सेलर इन्स्टीट्यूट "सागर" भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण

Crop Damage
Crop Damage Help : सातारा जिल्ह्यातील अतिवृष्टिबाधितांना १७.०४ कोटी रुपयांची मदत

(महसूल)

• अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार

(वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये)

• महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.

(ऊर्जा)

• अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता

(उच्च व तंत्र शिक्षण)

नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना

(उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com