Art Of Living : आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये श्री श्री नैसर्गिक किसान केंद्राचे उद्‍घाटन

Sri Sri Natural Kisan Kendra : काळी हळद, काटेरी भेंडी किंवा अगदी काळ्या कस्टर्ड सफरचंदासारख्या दुर्मीळ बियाण्यांच्या जाती आता देशी बीज कोष किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री नैसर्गिक किसान केंद्राच्या सीड बँकेत मिळू शकणार आहेत.
Art Of Living International Center
Art Of Living International Center Agrowon
Published on
Updated on

Bangalore News : काळी हळद, काटेरी भेंडी किंवा अगदी काळ्या कस्टर्ड सफरचंदासारख्या दुर्मीळ बियाण्यांच्या जाती आता देशी बीज कोष किंवा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या श्री श्री नैसर्गिक किसान केंद्राच्या सीड बँकेत मिळू शकणार आहेत. जागतिक आध्यात्मिक नेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत नुकतेच या केंद्राचे उद्‍घाटन करण्यात आले.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या इंटरनॅशनल सेंटरच्या मॉडेल फार्ममध्ये ३० किलो वजनाचे भोपळे दृष्टीस पडतात. याकडे महाराष्ट्रातील ५०० शेतकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आणि ते सगळे मॉडेल शेती कार्यशाळेच्या प्रशिक्षणासाठी बंगळूर येथे आले होते. या मॅाडेलमध्ये नैसर्गिक शेती तंत्र वापरले जाते आणि देशी बियाणे तयार केले जाते. आतापर्यंत सुमारे २.२ दशलक्ष शेतकऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतले आहे.

Art Of Living International Center
Natural Farming : तेरा लाख हेक्टरवर नैसर्गिक शेतीचे उद्दिष्ट

श्री श्री नैसर्गिक किसान केंद्राचे उद्‍घाटन श्री श्री रविशंकर, सद्गुरु सूर्यकांतेश्वर बाबा आणि मल्लिकार्जुन टी. यांनी केले. रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर न करता नैसर्गिक शेतीमध्ये ‘एसएसआयएएसटी’द्वारे दिले जाणारे प्रशिक्षण कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असा मला विश्वास आहे, असे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभासी प्रणालीद्वारे बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात २०,००० हून अधिक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘एसएसआयएएसटी’चे सुधीर छापते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांना पेरणी करताना खते आणि बियाणांसाठी खूप पैसे मोजावे लागतात. आम्ही शेतकऱ्यांना नैसर्गिकरित्या जवळपास शून्य खर्चाच्या पद्धतीचे प्रशिक्षण देत आहोत. आम्ही एक मॉडेल फार्मदेखील विकसित केले आहे.

Art Of Living International Center
Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांची खरी समृद्धी

जिथे देशी बियाणे आणि अनेक पिकांचा वापर करून, प्रति एकर कमाई २०,००० रुपयांवरून रु. १.५ लाखांपेक्षा जास्त झाली आहे. महाराष्ट्रात तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचते तेव्हा उन्हाळ्यात शेतकरी काहीही पिकवू शकत नाहीत.

परंतु बहुस्तरीय शेतीमुळे, शेती गवताने झाकले जाते ज्याने तापमान २५ अंशांपर्यंत कमी होते आणि शेतकरी सहजपणे पिके घेऊ शकतात आणि उत्पन्न मिळवू शकतात, असेही छापते यांनी सांगितले. महाराष्ट्रात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने ५०० मॉडेल फार्म आणि सीड बँक विकसित करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com