Sangram Thopte : कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांचा खोळंबा, एजंटांपुढे पायघड्या

Latest Agriculture News : वेल्हे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना रस्त्याच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या.
Sangram Thopte
Sangram Thopte Agrowon
Published on
Updated on

Pune News : वेल्हे तालुक्यात कोट्यवधी रुपयांचा निधी येत असताना रस्त्याच्या दुरवस्थेबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. यावेळी संतप्त आमदार संग्राम थोपटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा बोगस कारभार समोर येत असून कारवाई करावी लागेल, असा इशारा देत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

वेल्हे पंचायत समितीच्या सभागृहामध्ये शुक्रवारी (ता. ६) सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची समन्वय सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी नागरिकांनी विविध विभागांच्या अडचणींचा पाढा आमदार थोपटे यांच्यासमोर वाचला.

Sangram Thopte
Indian Agriculture : शेतीच देऊ शकते आनंददायी जीवनशैली

अभिलेख कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत तक्रार शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख दीपक दामगुडे यांनी केली, तर शेतकऱ्यांच्या मोजणी केलेल्या जमिनीच्या क प्रत मिळण्यासाठी अनेक महिने लागत असून, एजंटांना तत्काळ कागदपत्रे मिळत असल्याचा आरोप केला. तर कामात सुधारणा न झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवराज शेंडकर यांनी दिला.

Sangram Thopte
Agriculture Inputs : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांचे सल्लागार व्हावे

आमदार थोपटे वेल्हे ते केळद, भट्टी ते जाधववाडी, कोदवडी फाटा ते चिरमोडी, पासली ते हारपूड या विविध रस्‍त्यांच्या कामांच्या दर्जाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग हा ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करतोय का, असा सवाल उपस्थित केला. या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त करत तुमच्यावर कारवाई करावी लागेल अशा शब्दांत कानउघाडणी केली.

या वेळी तालुक्यातील महावितरण, कृषी विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समितीमधील विविध विभागांचा आढावा, जलसंपदा विभाग, एसटी, परिवहन विभाग, पीएमआरडी या विभागांचा आढावा घेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या, त्यानुसार सूचना देण्यात आल्या.

या वेळी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, माजी सभापती दिनकर सरपाले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, वेल्ह्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे, भोर वेल्हा कृती समितीचे अध्यक्ष माउली दारवटकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू राऊत, युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर विविध गावच्या सरपंचांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com