Sindhudurg Rain News : सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचे डोळे आभाळ आणि भातरोपांकडे

Rice Cultivation : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दिवसभरात पडणाऱ्या एक दोन सरीदेखील थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळ आणि भातरोपांकडे लागले आहेत.
Karad Sowing
Karad SowingAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दिवसभरात पडणाऱ्या एक दोन सरीदेखील थांबल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आभाळ आणि भातरोपांकडे लागले आहेत. पाऊस पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढू लागली आहे.

पावसाअभावी भात रोपांची अवस्था नाजूक बनत चालली असून दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात यावर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस झाला नाही. त्यातच दरवर्षी ७ ते ८ जूनला होणारे मॉन्सूनचे आगमन यावर्षी १२ जूनला झाले. मॉन्सूनच्या आगमनानंतर एक दोन दिवस जिल्ह्यात हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या.

पाऊस पडेल या अपेक्षेने काही शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकांच्या कामाला सुरुवात केली. जिल्ह्यात ४० टक्के रोपवाटिका तयार केल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हलक्या सरीदेखील थांबल्या. त्यामुळे दुबार पेरणीच्या संभाव्य संकटाने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

Karad Sowing
Kharif Sowing Update : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

खरीप हंगाम संकटात

जिल्ह्यात ६० हजार हेक्टरवर खरिपात भातपीक उत्पादन घेतले जाते. पाऊस लांबल्याने यावर्षीचा खरीप हंगाम संकटात येण्याची शक्यता आहे. दरवर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्यानंतर तातडीने भात रोपवाटिकांच्या कामांना सुरुवात होऊन १० जूनपूर्वी पेरण्या पूर्ण व्हायच्या.

अनेक ठिकाणी भिजवणीच्या रोपांची लागवड १० ते १२ जूनपासून सुरू व्हायची परंतु अद्याप काही भागांत पेरण्याच झालेल्या नाहीत.

जिल्ह्यात शुक्रवारपासून (ता. २३) पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर पुढे चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे भात रोपवाटिका अन्य शेतीच्या कामांना पोषक वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवात करावी.
डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, ग्रा.कृ.मौ.सेवा मुळदे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com