Jalgaon Market Committee : जळगावमध्ये आघाडीची मोट कोसळली

APMC Update : जळगाव बाजार समितीच्या सभापती निवडीला सभागृहाच्या बंद दाराआड ठोकशाही चालवून पदे हिसकाविण्यात आली. मारहाण, शिवीगाळ यामुळे आघाडीत किती बेबनाव आहे, हेदेखील उघड झाले.
Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc ElectionAgrowon

Market Committee Jalgaon News : जळगाव बाजार समितीच्या सभापती निवडीला सभागृहाच्या बंद दाराआड ठोकशाही चालवून पदे हिसकाविण्यात आली. मारहाण, शिवीगाळ यामुळे आघाडीत किती बेबनाव आहे, हेदेखील उघड झाले.

विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न यामुळे सपशेल अपयशी ठरला आहे. याच वेळी बाजार समितीमधील ठोकशाहीची संस्कृती देवकरांची मोठी कोंडी करील, हेदेखील दिसत आहे.

देवकरांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधकांना एकत्र करून बाजार समितीच्या निवडणुकीत विजय मिळविला. त्यात त्यांना लक्ष्मण पाटील यांची चांगली साथ लाभली. वित्तीय स्रोत पाटील यांनी उभे केले. पालकमंत्र्यांविरोधात शड्डू ठोकला. इतरांनी जे आघाडीसाठी केले नाही, ते पाटील यांनी केले.

बाजार समितीचे ते माजी सभापती व ज्येष्ठ संचालक आहेत. सभापतिपदासाठी त्यांची भक्कम दावेदारी होती. पण पाटील हे अल्पसंख्याकांत गणल्या जाणाऱ्या गुर्जर समाजातील आहे. देवकरांनी अल्पसंख्याकांना सभापतीपदी संधी देण्याऐवजी विधानसभेला मदत होईल, यासाठी श्यामकांत सोनवणे यांना सभापतीपदी संधी दिली. पण ही संधी देताना लक्ष्मण पाटील यांना विश्वासात घेतले नाही.

Jalgaon Apmc Election
Jalgaon APMC : जळगाव बाजार समितीच्या सभापतिपदी निवडीला गालबोट

यामुळे एवढा बेबनाव झाला की, मारहाण, शिवीगाळ आणि पोलिस बंदोबस्त वाढविण्यापर्यंतची वेळ आली. निवडीच्या वेळी सभागृहात बंद दाराआड जे झाले, त्याबाबत लक्ष्मण पाटील यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत. सूचकाला धमकाविले, उपसभापतीपदासंबंधी एकाने जो अर्ज दाखल केला, तो फाडून फेकण्यात आला.

आपल्या नातेवाइकाच्या कानशिलात लगावली. आपण सभापतीपदासंबंधी जो अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला, त्याबाबत दमबाजी झाली. मला सुरक्षित घरी जाऊ द्या, असे पाटील तेथे म्हणत होते. यावरून सभागृहात किती दहशत होती, काय प्रकार घडला, हे लक्षात येते.

विशेष म्हणजे किरकोळ कारणावरून सर्वसामान्यांचा छळ करणाऱ्या शासकीय यंत्रणा म्हणजेच पोलिस, निबंधक कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर हा प्रकार घडला. पण सर्वच गप्प होते, यामुळे दहशत किती आहे, हे दिसते.

बाजार समितीत अक्षरशः दोन ते अडीच तास प्रचंड तणाव होता.पाटलांचे आडाखे चुकलेलक्ष्मण पाटील हे राजकारणात ताकदवान मानले जातात. मागील वेळेस त्यांनी सेना-भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जाऊन स्वतंत्र पॅनेल तयार केले. पाच संचालकही त्यांनी निवडून आणले.

पुढे बाजार समितीत त्यांना सभापतीपदाची संधीही मिळाली. या वेळेस बाजार समितीच्या निवडणुकीचा किरकोळ किंवा शून्य अनुभव असलेल्या गुलाबराव देवकरांसोबत ते गेले. पाटील देवकरांसोबत राहीले नसते तर देवकरांना पाच उमेदवार विजयी करून आणणेदेखील कठीण होते. पण पाटील यांच्यामुळे आघाडीला मजबुती आली.

लक्ष्मण पाटील हे कुठल्याही पक्षाचे लेबल घेऊन फिरत नाही. या वेळेसही पाटील यांनी स्वतंत्र पॅनेल तयार करून आपली ताकद सिद्ध करायला हवी होती, असा मुद्दाही चर्चिला जात आहे.

Jalgaon Apmc Election
Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समितीत जिल्हा बँकेचा पॅटर्न शक्य

देवकरांबाबत नाराजी

गुलाबराव देवकर यांनी सभापतिपदाचा विचार करताना आपली विधानसभा निवडणूक सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत जे घडले, त्यामुळे ग्रामीण मतदार सावध झाला आहे.

धरणगाव, जळगाव तालुक्यात देवकरांच्या छायाछत्राखाली ठोकशाही फोफावेल, असा मुद्दा अल्पसंख्याक मंडळी उपस्थित करीत असून, देवकरांचे पुढचे मनसुबे यशस्वी होतील की नाही, यावरही प्रश्न आहे. अर्थात देवकरांनी आघाडीची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, पण ही मोट कोसळली आहे.

निवडणुकीत वित्तीय स्रोत महत्त्वाचे असतात शिवाय सहानुभुतीदेखील हवी असते, ही सहानुभूती व स्रोत तयार करणारी मंडळीदेखील देवकरांनी यानिमित्त गमावली आहे, असेही म्हणता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com