Soil Testing
Soil TestingAgrowon

Soil Testing : द्राक्षामध्ये माती-पाणी परीक्षणाला महत्त्व

द्राक्षाच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादनासाठी माती-पाणी परीक्षणाबरोबर पान-देठ परीक्षणही तेवढेच आवश्यक आहे.

Pandharpur News : द्राक्षाच्या गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादनासाठी माती-पाणी परीक्षणाबरोबर पान-देठ परीक्षणही तेवढेच आवश्यक आहे. त्यानुसार अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकेल, असे मत प्रयोगशील द्राक्ष उत्पादक दत्तात्रेय भोसले (सरकोली) यांनी येथे व्यक्त केले.

भोसे (ता. पंढरपूर) येथे ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनातील तंत्र याविषयावर श्री. भोसले बोलत होते. या वेळी सरपंच ॲड. गणेश पाटील, उपसरपंच भारत जमदाडे, प्रा. प्रशांत कुंभार, यारा फर्टिलायझरचे झोनल मॅनेजर सागर मस्के, धैर्यशील पाटील, ग्रामपंचायत सदस्य देविदास जमदाडे, संजय कोरके, श्री. व्यवहारे आदी उपस्थित होते.

Soil Testing
Grape Export : सांगलीतून परदेशातील द्राक्ष निर्यातीत १४७६ टनांनी वाढ

श्री. भोसले म्हणाले, की द्राक्षामध्ये झाडावर जादा घड न ठेवता कमी द्राक्षघड ठेवा, प्रत्येक झाडावर तीस ते पस्तीस घडांची संख्या ठेवा. आंबट माल विक्रीस पाठवू नका, घडांचे वजन न बघता घडातील मण्यांचे वजन बघा. एका मण्याचे वजन सहा ते आठ ग्रॅम असायला पाहिजे.

द्राक्ष बागेत तणनाशकांचा अजिबात वापर करू नका. त्यासाठी ग्रास कटर वापरा, दोन ते अडीच फूट तण वाढल्यानंतर ग्रास कटरच्या साह्याने कापणी करा, त्याचा खत म्हणूनही वापर होईल. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंचे संवर्धन होण्यास मदत होईल, जमीन भुसभुशीत राहील, असेही ते म्हणाले.

यारा कंपनीचे झोनल मॅनेजर मस्के यांनी यारा कंपनीच्या विविध उत्पादनांची आणि त्यांच्या वैशिष्ट्याची माहिती दिली. या वेळी प्रा. कुंभार, योगेश गरुड आदींनी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘ॲग्रोवन’चे सीनियर एक्झिक्युटिव्ह संदेश कुलकर्णी यांनी केले ‘सकाळ’चे बातमीदार सुनील कोरके यांनी सूत्रसंचालन केले. तर संजय कोरके यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com