हेमंत जगतापशेडनेटचा मुख्य सांगाडा तयार करण्यासाठी जीआय पाइप वापरले जातात. गंजू नये म्हणून गॅल्व्हनाइज्ड आयर्न पाइप्सना प्राधान्य द्यावे. जीआय पाइप्सना वेल्डिंग न करता एकमेकांना घट्ट जोडण्यासाठी क्लॅम्प्सचा वापर होतो.शेडनेटमध्ये पाइप्स आणि क्लॅम्प्सना एकत्र बांधून ठेवण्याचे काम नटबोल्ट करतात..शेडनेट हाउस उभारणीसाठी लागणारे फिटिंग घटक हे घराच्या फिटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात. हे घटक प्रामुख्याने स्ट्रक्चरला मजबुती देण्यासाठी आणि शेडनेट व्यवस्थित बसण्यासाठी वापरले जातात. शेडनेट हाउस उभारणी करताना वापरले जाणारे फिटिंग घटक केवळ जोडणीसाठी नसून संपूर्ण संरचनेची मजबुती, स्थिरता आणि आयुष्य यावर त्यांचा थेट परिणाम होतो..Housing Installment Delay: घरकुलचा दुसरा हप्ता चार महिन्यांपासून रखडला.जीआय पाइपमुख्य सांगाडा तयार करण्यासाठी जीआय पाइप वापरले जातात. गंजू नये म्हणून गॅल्व्हनाइज्ड आयर्न पाइप्सना प्राधान्य द्यावे.शेडनेट हाउस उभारणीमध्ये जीआय पाइप हा सर्वांत महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. साध्या लोखंडी पाइपला गंज चढतो, परंतु जीआय पाइपवर झिंकचा थर असल्यामुळे तो शेतीतील ओलावा आणि खतांच्या संपर्कात येऊनही अनेक वर्षे टिकतो..मुख्य प्रकारगोल पाइपहे मुख्य खांब आणि कमानी तयार करण्यासाठी वापरले जातात. यांची मजबुती सर्व दिशांनी समान असते.चौकोनी पाइपहे प्रामुख्याने दरवाजाचे फ्रेम किंवा कडेच्या मजबुतीसाठीShadeNet House वापरले जातात.पाइपची जाडी आणि व्यासशेडनेटच्या रचनेनुसार पाइपची निवड करावी.मुख्य खांबसाधारणपणे ६० मिमी (२ इंच) व्यासाचे पाइप वापरले जातात. यांची जाडी २ मिमी ते ३ मिमी दरम्यान असते.परलिन्स आणि कमानीहे खांबांना जोडण्यासाठी वापरले जातात. यासाठी ३३ मिमी ते ४८ मिमी (१ ते १.५ इंच) व्यासाचे पाइप वापरले जातात. यांची जाडी २ मिमी ते ३ मिमी असते..City Development: सव्वादोनशे चौरसफुटांपर्यंतच्या घरांना घरपट्टी १०० टक्के माफ.सपोर्ट पाइप्ससंरचनेला अधिक ताकद देण्यासाठी बाजूने तिरपे पाइप लावले जातात. यासाठी ४८ मिमी (१.५ इंच) व्यासाचे पाइप वापरले जातात. यांची जाडी २ मिमी ते ३ मिमी दरम्यान असते.जीआय पाइपचे फायदेगंजरोधकशेडनेटमध्ये फॉगर्समुळे सतत आर्द्रता असते. जीआय पाइपला गंज लागत नाही, त्यामुळे स्ट्रक्चर १५ ते २० वर्षे सहज टिकते.वजन पेलण्याची क्षमताताशी १०० ते १२० किमी वेगाने वाहणारा वारा आणि पावसाच्या पाण्याचा भार पेलण्यासाठी हे पाइप सक्षम असतात.वेल्डिंग आणि फिटिंगहे पाइप वेल्डिंग करण्यासाठी किंवा क्लॅम्प्सने जोडण्यासाठी अत्यंत सोपे असतात.पाइप क्लास आणि आयएसआय मार्क.आयएसआय मार्कनेहमी ‘B’ क्लास किंवा ‘C’ क्लासचे आयएसआय मार्क असलेले पाइप निवडावेत (उदा. IS ११६१:२०१४ मार्क असलेले पाइप वापरावेत.)झिंक कोटिंगपाइपवर झिंकचा थर एकसमान आहे की नाही हे तपासावे.पाइपची गुणवत्तापाइप सरळ असावेत, कारण वाकलेल्या पाइपमुळे संपूर्ण शेडनेटचे अलाइनमेंट बिघडू शकते.पाइप जोडणीचे घटकपाइप एकमेकांना जोडण्यासाठी फक्त वेल्डिंगवर अवलंबून न राहता फॅब्रिकेटेड क्लॅम्प्स आणि नट-बोल्ट्स वापरणे जास्त फायदेशीर ठरते, कारण भविष्यात गरज पडल्यास स्ट्रक्चर खोलून पुन्हा फिट करता येते..Constructing ShadeNet: शेडनेट उभारताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या?.शेडनेट जोडणी घटकशेडनेट फाटू नये आणि वाऱ्याने उडून जाऊ नये, तसेच जीआय पाइप सोबत व्यवस्थित बसवण्यासाठी हे घटक महत्त्वाचे आहेत.ॲल्युमिनियम प्रोफाइल- सी चॅनेल ः हे पाइपवर बसवले जातात. यामध्ये शेडनेट अडकवले जाते. कमीत कमी १९० ग्रॅम /मी वजनाची पट्टी वापरावी.झिगझॅग वायर ः प्रोफाइलमध्ये नेट लॉक करण्यासाठी या स्प्रिंग वायरचा वापर होतो. यामुळे शेडनेटला इजा न होता ती घट्ट बसते. कमीत कमी २.३ मिमी जाडीची झिंक कोटेड/प्लॅस्टिक कोटेड /पावडर कोटेड स्प्रिंग वापरतात.सेल्फ ड्रीलिंग स्क्रू / प्रोफाइल स्क्रू : प्रोफाइल जी आय पाइपला जोडण्यासाठी यांचा वापर होतो. कमीत कमी २० मिमी जाडीचे वापरतात..इतर सहायक घटकअॅग्रो शेड नेट ः गरजेनुसार ५० टक्के, ७५ टक्के किंवा ९० टक्के प्रकाश रोखणारी जाळी.पॉलिस्टर रोप ः नेटला आधार देण्यासाठी आणि बांधण्यासाठी.फाउंडेशन : जमिनीमध्ये स्ट्रक्चर घट्ट रोवून धरण्यासाठी उपयुक्त. पिलर जमिनीत मजबुतीने रोवले जाते.वादळी वाऱ्यात स्ट्रक्चर उखडण्यापासून संरक्षण मिळते. मजबूत फाउंडेशन म्हणजे दीर्घकाळ टिकणारे शेडनेट हाउस..DCM Sunetra Pawar: यशवंतरावांच्या समाधीस्थळी सुनेत्रा पवार नतमस्तक.साहित्य निवडतानागंजरोधक साहित्य : शेडनेटमध्ये ओलावा जास्त असतो, म्हणून सर्व फिटिंग्ज (नट, बोल्ट, क्लॅम्प) जीआय किंवा स्टेनलेस स्टीलचे असावेत.यूव्ही स्टॅबिलाइज्ड : प्लॅस्टिकचे घटक किंवा जाळी ही यूव्ही स्टॅबिलाइज्ड असावी, जेणेकरून उन्हामुळे ती लवकर खराब होणार नाही.मजबुती : मोठ्या वावटळीत किंवा वाऱ्यात स्ट्रक्चर टिकून राहण्यासाठी दर्जेदार क्लॅम्प्सचा वापर करावा.शेडनेट हाउसचे आयुष्य ५ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक ठेवायचे असेल तर फ्रेमपेक्षा फिटिंग घटकांची गुणवत्ता अधिक महत्त्वाची असते..नट बोल्ट्ससर्व सांधे घट्ट करण्यासाठी उच्च दर्जाचे नट बोल्ट वापरले जातात.शेडनेट हाउसच्या उभारणीत नट बोल्ट हे जरी आकाराने लहान घटक असले, तरी संपूर्ण स्ट्रक्चरची मजबुती त्यांच्यावरच अवलंबून असते. शेडनेटमध्ये पाइप्स आणि क्लॅम्प्सना एकत्र बांधून ठेवण्याचे काम हे नट बोल्ट करतात.नट बोल्टचे प्रकारहॉट डीप गॅल्व्हनाइज्ड ः शेडनेटमध्ये नेहमी ओलावा असतो. साध्या लोखंडी नट-बोल्टला लवकर गंज लागतो, ज्यामुळे स्ट्रक्चर कमकुवत होऊ शकते. म्हणून ‘हॉट-डीप’ केलेले नट-बोल्ट वापरणे अनिवार्य आहे. झिंक प्लेटेड नट बोल्ट चा वापर करतात.स्टेनलेस स्टील ः काही प्रगत शेडनेटमध्ये गंज अजिबात लागू नये म्हणून एसएस ३०४ दर्जाचे नट-बोल्ट वापरले जातात, जे महाग असतात पण टिकाऊ असतात.सेल्फ-ड्रीलिंग स्क्रू ः हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम प्रोफाइल पाइपला जोडण्यासाठी वापरले जातात. यांना सेल्फ ड्रील्लिंग स्क्रू असेही म्हणतात. कमीत कमी २० मिमी जाडीचे वापरतात..महत्त्वाचे आकारशेडनेटच्या रचनेनुसार वेगवेगळ्या आकाराचे नट-बोल्ट लागतात.व्यास ः साधारणपणे ८ मिमी (M८) किंवा १० मिमी (M१०) व्यासाचे बोल्ट क्लॅम्प्ससाठी वापरले जातात.लांबी ः पाइपच्या जाडीनुसार आणि क्लॅम्पच्या प्रकारानुसार १.५ इंच ते ३ इंचांपर्यंत लांबीचे बोल्ट लागतात.वॉशर्सचे महत्त्वनट-बोल्ट लावताना वॉशर्स वापरणे अत्यंत गरजेचे आहे.प्लेन वॉशर : बोल्टचा दाब समान विभागण्यासाठी.स्प्रिंग वॉशर : वाऱ्याच्या कंपनामुळे नट ढिला होऊ नये म्हणून स्प्रिंग वॉशर वापरला जातो. हे नटला जागेवर लॉक करून ठेवतात..नट-बोल्ट वापरताना घ्यायची काळजीफूल थ्रेडेड की हाफ थ्रेडेड : क्लॅम्प्ससाठी शक्यतो हाफ थ्रेडेड बोल्ट वापरावेत, कारण ते जास्त ताण पेलू शकतात. टायटनिंग ः नट-बोल्ट खूप जास्त घट्ट करू नका की पाइपला पिचक पडेल, आणि खूप ढिलेही ठेवू नका.तपासणी : दर ६ महिने ते १ वर्षाने स्ट्रक्चरमधील नट-बोल्ट तपासावेत. वाऱ्यामुळे काही नट ढिले झाले असल्यास ते पुन्हा घट्ट करावेत.खरेदी करतानानेहमी हाय टेन्साईल दर्जाचे नट-बोल्ट निवडावेत. साध्या दुकानात मिळणारे स्वस्त नट-बोल्ट वाऱ्याच्या वेगात तुटू शकतात, ज्यामुळे संपूर्ण शेडनेट कोसळण्याचा धोका असतो.- हेमंत जगताप८२७५३७१०८२(वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.