Water Crisis Management : पाण्याच्या मागणीनुसार त्वरित टँकर सुरू करा

Kumar Ashirwad :आवश्‍यक त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी दिल्या आहेत.
Kumar Ashirwad
Kumar AshirwadAgrowon
Published on
Updated on

Solapur News : टंचाईच्या उपाययोजना राबवताना ग्रामीण आणि शहरी भागात टँकर सुरू करण्याची मागणी आल्यावर त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी यांनी सर्व बाबींची पडताळणी करावी, आवश्‍यक त्या ठिकाणी त्वरित टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांनी दिल्या आहेत.

नियोजन भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाइन प्रणालीद्वारे जॉईन झाले होते.

Kumar Ashirwad
Water Level : शिराळा तालुक्यातील पाणीसाठ्यात घट, सात तलाव कोरडे

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेची कोणतीही अडचण नाही ही बाब लक्षात घेऊन टंचाई उपाययोजना अत्यंत परिणामकारकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा.

Kumar Ashirwad
Water Crisis : ‘अंजना पळशी’त सिंचनासाठी पाणी मिळेना

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी खरीप अनुदान व दुष्काळाच्या अनुषंगाने तालुका निहाय आढावा घेऊन सूचना दिल्या. खरीप अनुदानाच्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी राहिलेले आहे त्यांचे ई केवायसी तत्काळ करून घेण्याबाबत तहसीलदारांना निर्देश दिले. उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर म्हणाले, टंचाईच्या उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या सूचनांचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी पालन करावे. सर्व तालुकास्तरीय यंत्रणाशी परस्पर समन्वय ठेवावा व चारा जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

पाणी उपसा रोखण्यासाठी पथक

उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर नदी काठावरून पाण्याचा उपसा होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे का याची खात्री करावी. वीज कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत समन्वय ठेवून पाणी उपसा होणार नाही यासाठी पथके नियुक्त करावीत अशी सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com