Glyphosate Ban : ग्लायफोसेटच्या विक्रीवर तत्काळ प्रभावाने हवी बंदी

Illegal Sale Of Glyphosate : भारतीय किसान संघाच्या माहितीनुसार, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी रितसर पत्र लिहीत मध्य प्रदेश सरकारला ग्लायफोसटच्या दुष्परिणामाची माहिती दिली.
Glyphosate Ban
Glyphosate BanAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : प्रतिबंधानंतरही देशभरात ग्लायफोसटचा सर्रास वापर आणि विक्री होत आहे. त्याचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत असून कर्करोग, हृदयरोग, पाचन प्रक्रिया त्याबरोबरच त्वचारोगासारख्या विकाराचे प्रमाण त्यातूनच वाढीस लागले आहे. त्याची दखल घेत ग्लायफोसटवर त्वरित बंदी आणावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंवेवक प्रणीत भारतीय किसान संघाने केली आहे.

भारतीय किसान संघाच्या माहितीनुसार, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील जवाहरलाल नेहरु कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी रितसर पत्र लिहीत मध्य प्रदेश सरकारला ग्लायफोसटच्या दुष्परिणामाची माहिती दिली. त्याचाच आधार घेत भारतीय किसान संघाने देखील बंदीनंतरही सर्रास वापर होत असलेल्या ग्लायफोसटविरोधात अभियान राबविण्याचा ठरविले आहे.

केंद्रिय कृषी मंत्रालयाने आरोग्य तसेच सुरक्षा संबंधी चिंतेच्या परिणामी २१ ऑक्‍टोबर २०२२ रोजी एका अधिसूचनेद्वारा यावर पूर्णपणे बंदी लादण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर देखील कोणाच्या तरी कृपेने या घातक रसायनाचा सर्रास वापर होत असल्याचा आरोप भारतीय किसान संघाने केला आहे. ग्लायफोसटचा वापर करण्यासाठी कोण प्रोत्सहन देत आहे त्यामागे कोणाचे डोके आहे याचाही शोध घेतला जावा, अशी मागणी देखील संघाकडून करण्यात आली आहे.

Glyphosate Ban
Glyphosate : राज्यात ‘पीसीओ’ यंत्रणा उभी राहणे शक्य

ग्लायफोसेटचा वापर जैवविविधतेला घातक आहे. त्यातून पर्यावरणाशी निगडित माती, पाणी आणि हवा हे मुख्य घटक देखील दूषित होत घातक रसायनात परिवर्तीत होणार आहेत. हा प्रकार म्हणजे सामान्यांना मोफत कॅसर वितरीत करण्यासारखा आहे. असे असले तरी त्याकरिता शेतकऱ्यांना दोषी ठरविणे चुकीचे राहणार आहे.

Glyphosate Ban
Glyphosate Ban : ‘ग्लायफोसेट’प्रकरणी केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

शेतकऱ्यांऐवजी प्रतिबंधानंतर देखील हे घातक रसायन वापरण्याची मुभा देणारी यंत्रणाच त्यासाठी अधिक दोषी आहे. भारतीय किसान संघाने यापूर्वी वारंवार ग्लायफोसेटवर बंदीची मागणी केली आहे. कारण त्याचा वापर करुन तयार झालेल्या उत्पादनांमुळे सामान्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. ग्लायफोसेटचा वापर शेतीक्षेत्रात वाढला असून पर्यावरणाची देखील हानी यामुळे होत असल्याचे किसान संघाचे म्हणणे आहे.

श्रीलंका, इस्राईल, नेदरलॅंड, फ्रान्स, कॅनडा, अर्जेंटिना यासह तब्बल ३५ देशांनी ग्लायफोसेटचे दुष्परिणाम अभ्यासल्यानंतर त्यावर पूर्णपणे बंदी लादली आहे. भारतात याचा वापर केवळ चहा बागांपुरताच मर्यादित आहे. पडीक क्षेत्रावरही याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु धान्य उत्पादनात याचा सर्रास वापर होत आहे.
- मोहिनी मोहन मिश्र, अखिल भारतीय महामंत्री, भारतीय किसान संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com