Kolhapur Farmers : शेतीसाठी काटकसरीने पाणी वापरल्यास उपसाबंदी नको : हसन मुश्रीफ

Agriculture Water : उपसा बंदी तूर्तास नको, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरून सर्वांना मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
Kolhapur Farmers
Kolhapur Farmersagrowon

Agriculture Water Kolhapur : उपसा बंदी तूर्तास नको, शेतीसाठी पाणी काटकसरीने वापरून सर्वांना मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. उर्वरित पाणीसाठा लक्षात घेऊन उपसा बंदीबाबत दर तीन आठवड्याला कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असा निर्णय काल (ता.११) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात ही बैठक झाली.

मात्र, शेतीसाठी पाण्याचा उपयोग काटकसरीनेच करावा लागेल. दर तीन आठवड्यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यावेळी धरणातील पाण्याचा साठा लक्षात घेऊन उपसाबंदीबाबत निर्णय घेऊ. शासनाच्या विविध योजनांमधून शेतकऱ्यांनी सोलर यंत्र बसवून दिवसा पाणी वापर केल्यास पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच पैशांची बचतही होईल. असे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले'

काळम्मावाडी धरणाच्या गळती दुरुस्तीसाठी काढलेल्या निविदेची काल (दि.११) अंतिम मुदत होती. निविदा उघडून त्यांच्या रकमेचे मूल्यमापन करून कमी रकमेची निविदा भरलेल्या व्यक्तीला निविदा मंजूर करणे, वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याची माहिती देण्यात आली.

Kolhapur Farmers
Radhanagari Dam Water : राधानगरी धरणात पुरेसा साठा तर काळम्मावाडी धरणाचा पाणीसाठी चिंता व्यक्त करणारा

दुधगंगा प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता ४६ हजार ९४८ हेक्टर असून, त्यापैकी जून २०२३ अखेर ३६ हजार ३१७ हेक्टर क्षेत्र निर्मित झाले आहे. एकूण प्रकल्पीय पाणी वापर २७.०६ टीएमसी आहे. सध्या १२.७० टीएमसी पाणीसाठा आहे. या पाण्याच्या नियोजनातून सिंचनासाठी असलेला पाणीसाठा हा ९ टीएमसी आहे.

यातील १.८७ टीएमसी पाणी गैबी बोगद्यातून तर दुधगंगा खोयासाठी ६.५६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. गरज पडल्यास तुळशी प्रकल्पातील पाणी पंचगंगा व भोगावती नदीसाठी वापरले जाणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

या बैठकीस आमदार पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, माजी आमदार संजय घाटगे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, शिल्पा मगदूम- राजे, रोहित बांदिवडेकर, डी. डी. शिंदे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com