Smart Villages : शेतकरी संपन्न झाल्यास देश आत्मनिर्भर

Nitin Gadkari : देशात ‘स्मार्ट सिटी’ पेक्षा, ‘स्मार्ट व्हिलेज’ झाली पाहिजेत,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Pune News : गाव-खेडी, गरीब, कामगार, शेतकरी संपन्न होत नाही, तोपर्यंत देश आत्मनिर्भर होण्यात मोठ्या अडचणी आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष न दिल्याने शहरांची स्थिती बिकट झाली आहे. यामध्ये पुण्याचा देखील समावेश असून, देशात ‘स्मार्ट सिटी’ पेक्षा, ‘स्मार्ट व्हिलेज’ झाली पाहिजेत,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

अभियंता दिनानिमित्त कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग पुणे (सीओईपी) तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्यात रविवारी (ता. १५) गडकरी बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गिते, प्रा. सुजीत परदेशी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Agriculture Policy : सत्तासुंदरी अन् पुतनामावशीचे प्रेम

ज्येष्ठ उद्योगपती पी. एन. भगवती यांना ‘सीओईपी जीवनगौरव’ पुरस्काराने, तर अभिनेता वैभव तत्त्ववादी, राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सिक्कीमचे कॅबिनेट मंत्री राजू बसनेत, अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन चेसच्या कार्यकारी संचालक मोनिका पानपलिया आणि अमेरिकेतील टेस्ला मोटर्सचे वरिष्ठ संचालक हृषीकेश सागर यांना ‘सीओईपी अभिमान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : गुणवत्तेच्या आधारावर उद्यमशीलता विकसित करा

या वेळी गडकरी म्हणाले, ‘ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर हेच भविष्य आहे. संशोधन, नावीन्य या आधारे देशाचा विकास मोजला जातो. देशात २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करावे लागते. त्यातून एकूण प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण होते. संशोधन स्थानिक गरजा भागवणारे, आर्थिकदृष्ट्या किफायतशीर, शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले असले पाहिजे. वाहनउद्योगात भारत जपानला मागे टाकून आता तिसऱ्या स्थानी आहे.

सध्या २२ लाख कोटी रुपयांची होणारी उलाढाल ५५ लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यात संशोधनाची भूमिका मोलाची ठरणार आहे. पुढील पाच वर्षांत शहरी वाहतुकीमध्ये सर्व विद्युत वाहनेच असतील. भारत अमेरिकेला मागे टाकेल. सर्व मोठे वाहन उद्योग भारतात आहेत. नवउद्यमींनी बॅटरीच्या क्षेत्रात खूप चांगले काम केले आहे. पुढील दोन वर्षांत भारत सेमी कंडक्टर उत्पादनाचे केंद्र असेल,’ असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. संशोधन, नवसंकल्पनेच्या क्षेत्रात देशातील अभियंत्यांचे काम उत्तम आहे, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com