Kolhapur News : दानवाडला बंधारा बांधून व घोसरवाडमधून दूधगंगा नदीतून (Dudhganga River) पाणी उपसा करून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सिद्धेश्वर पाणीपुरवठा (Water Supply) संस्थेकडून आला आहे.
परिसरातील १३ गावांची इच्छा असेल तरच प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला जाईल, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी (ता. १०) दिली.
घोसरवाड (ता. शिरोळ) येथे खासदार मानेंच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक झाली. या वेळी इचलकरंजीला घोसरवाडमधून पाणी देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली.
या वेळी खासदार माने यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘विजीतसिंह शिंदे-सरकार यांनी सिद्धेश्वर पाणीपुरवठा संस्थेकडून प्रस्ताव दिला आहे. इचलकरंजीला घोसरवाडमधून पाणी देण्याची तयारी दर्शवली आहे; मात्र काही सूचना केल्या आहेत. सध्या परिसरात दूधगंगा नदी कोरडी आहे.
घोसरवाडमधून सात गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.
दानवाडला उंचीचा बंधारा बांधल्यास तर घोसरवाडमधून इचलकरंजीस पाणीउपसा करता येईल. नदी सतत प्रवाहित राहिल्यामुळे महाराष्ट्रातील दूधगंगा काठावरील १३ गावांना बारमाही पाणी मिळेल.
ते म्हणाले, की प्रस्तावानुसार महाराष्ट्रातील शेवटच्या गावात बंधारा होणार असल्याने एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही; मात्र, हा प्रस्ताव पाणीपुरवठा संस्थेचा होता.
ग्रामस्थांची इच्छा असेल तरच प्रस्ताव मांडून शासनपातळीवर पाठपुरावा होईल. संबंधित गावांतील ग्रामस्थांशी संवाद सुरू आहे. लवकरच समन्वय बैठकही होईल.
सुळकूड योजनेचे काम सुरूच
सुळकूड योजनेसाठी निधी मंजूर आहे. त्या कामाची निविदा काढली आहे. त्याला मक्तेदारांचा प्रतिसाद आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.