Summer Heat: कडक उन्हाळ्यामुळे नागरिकांचा कल शीतपेयांकडे वळला आहे. लिंबूपाणी, उसाचा रस, सरबतांसोबतच सध्या बाजारात दाखल झालेल्या रसरशीत ताडगोळ्यांना मागणी असल्याने डझनाला १५० रुपये भाव मिळत आहे. .डहाणू, बोर्डी तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची आवक बाजारात होते. रस्त्यालगत अनेक विक्रेते ताडगोळ्यांची विक्री करताना दिसत आहेत. उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी ताडगोळे अत्यंत उपयुक्त ठरत असल्याने नागरिकांकडून त्यांना विशेष पसंती मिळत आहे..Cucumber Cultivation: भरघोस उत्पादनासाठी उन्हाळ्यात काकडीची योग्य लागवड पद्धत काय?. पाण्याचेप्रमाण अधिक असल्याने शरीराला थंडावाबरोबरच खनिजे, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस तसेच अ, ब आणि क जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते..Orange Harvesting: नफा वाढवण्यासाठी संत्र्याची तोडणी आणि वाहतूक पद्धती.तोडणीसाठी खर्चताडगोळ्यांच्या किंमतीत यंदा वाढ झाली आहे. उंच ताडाच्या झाडावर चढून ताडगोळे उतरविण्याची प्रक्रिया अत्यंत कष्टाची, धोकादायक असल्याने मजुरांची कमतरता भासत आहे..आगामी महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ताडगोळ्यांच्या विक्री वाढली आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी उड्डाणपूल परिसरात अनेक विक्रेते ताडगोळे विकताना दिसत असून आजूबाजूच्या गावांतील विक्रेतेही यात्रेसाठी तयारी करत आहेत. मुंबई, ठाणे तसेच गुजरातमधून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात ताडगोळ्यांची खरेदी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.