ठळक मुद्देयावर्षी कडाक्याची थंडू पडू शकतोयावर्षी ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यतापिकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे आयसीएआर मूल्यमापन करणार.Indian agriculture 2025: रब्बी पिकांसाठी थंडी महत्वाची असते. मात्र अतिथंडी पिकांचे नुकसान करते. यंदाच्या हंगामात ला निना परिस्थितीमुळे अतिथंडी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर असामान्य थंडीचा रब्बी पिकांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचे मूल्यमापन भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) करणार आहे..भारताच्या एकूण धान्य उत्पादनात रब्बीतील गहू आणि कडधान्याचा वाटा सुमारे ४५ टक्के आहे. यामुळे थंडीचा रब्बी पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? त्यासाठी विविध पिकांचा आणि प्रदेशांचा सविस्तर अभ्यास महत्त्वाचा आहे. याबाबतचे वृत्त मिंटने दिले आहे..Organic Farming Subsidy: सेंद्रिय शेतीसाठी सरकारकडून मिळणार ६ लाखांपर्यंत अनुदान! जाणून घ्या योजनेची माहिती."यावर्षी सामान्यपेक्षा अधिक थंडी असू शकते, ही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध पिकांवर या कडाकाच्या थंडीचा काय परिणाम होतो?, याचा व्यापक अभ्यास आम्ही करु," असे आयसीएआरचे महासंचालक आणि कृषी संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव मांगी लाल जाट यांनी सांगितले..भारतीय हवामान विभागाचे (IMD) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी याआधी म्हटले होते की, हवामान विभागाकडून ऑक्टोबरच्या अखेरीस अधिक सविस्तर विश्लेषण सादर केले जाईल..रब्बी हा भारतातील हिवाळी पीक हंगाम आहे. याचा कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान असतो. रब्बी हंगामात पीक पेरणी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान करण्यात येते. तर कापणी मार्च ते एप्रिल दरम्यान केली जाते. गहू, कडधान्ये, तेलबिया, भरड धान्ये आणि भात ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके आहेत. २०२४-२५ मधील रब्बी हंगामात सुमारे ६६.१ दशलक्ष हेक्टरपेक्षा पीक पेरणी झाली होती..Tomato Diseases: टोमॅटोवरील मर आणि करपा रोगाचे व्यवस्थापन.रब्बी हंगाम हा गहू, कडधान्ये आणि तेलबियांसारखी मुख्य धान्ये पिके घेऊन देशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्न सुरक्षेला आधार देतो. याशिवाय, अन्न पुरवठा आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून हा हंगाम राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतही महत्त्वपूर्ण योगदान देतो..ला निना परिस्थितीचा हिवाळी पिकांवर होणारा परिणाम हा त्या-त्या प्रदेशावर अवलंबून असतो. पण अनेकवेळा अधिक पाऊस आणि तीव्र थंडीमुळे जमिनीतील ओलावा वाढू शकतो. यामुळे रब्बी पिकांसाठी आवश्यक असलेले पाण्याचे स्रोत भरून निघण्यास मदत होते. मात्र, मैदानी प्रदेशात अधिक पाऊस पडल्याने पाणी साचून राहू शकते. परिणामी पिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच पीक कापणीला विलंब होऊ शकते..विशेषतः पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील मैदानी भागांमध्ये पीक उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो, असे भारतीय कृषी संशोधन परिषदेशी संलग्न असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले..हवामान विभागातील एका अधिकाऱ्याच्या मते, भारतात ला निना परिस्थिती २०२०-२१ आणि २०२१-२२ मधील डिसेंबर आणि जानेवारी दरम्यान निर्माण झाली होती. दरम्यान, ‘ला निना’मुळे नेमके किती नुकसान झाले? याचे मोजमाप करणे कठीण आहे. कारण पीक उत्पादकता ही इतर विविध घटकांवर अवलंबून असते..डिसेंबरपर्यंतच्या तीन महिन्यांच्या कालावधीत समुद्राच्या काही भागात ला निना परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे. "या वर्षी ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या तीन महिन्यांसाठी ३० सप्टेंबर अथवा १ ऑक्टोबर रोजी अंदाज जाहीर केला जाईल," असे महापात्रा यांनी म्हटले आहे..ला नीना म्हणजे काय?‘ला नीना’चा स्पॅनिश भाषेत अर्थ 'छोटी मुलगी' असा होतो. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) त्याचे वर्णन " विषुववृत्तीय प्रशांत महासागर प्रदेशातील समुद्रातील पाण्याचे तापमान असामान्य थंड होणे" असे केले जाते. भारतासाठी, ‘ला नीना’चा संबंध बहुतांश वेळा सामान्यपेक्षा थंड हवामान आणि कडाक्याच्या थंडीशी जोडला जातो.ला नीना स्थिती ही भारतात सामान्यतः अधिक तीव्र हिवाळ्याशी संबंधित असते. ही एक हवामानविषयक घटना आहे. ही एल निनो-सदर्न ऑस्सिलेशन (ENSO) चक्राचा एक भाग आहे. या स्थितीत मध्य आणि पूर्व भागातील उष्ण कटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा कमी राहते. त्यामुळे जगभरातील हवामानाच्या पॅटर्नवर त्याचा लक्षणीय परिणाम होऊ शकतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.