Nagpur News: खरीप हंगामातील शासकीय धान खरेदी सुरू झाली. दीड महिन्यात ७१ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदीही करण्यात आली. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याला धानाचे चुकारे मिळाले नाहीत. परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. .जिल्ह्यात खरीप हंगामात ९६ हजार ९९८.२८ हेक्टरवर धान पिकाची लागवड करण्यात आली होती. यातून शेतकऱ्यांना हेक्टरी ३५ ते ४० क्विंटल धानाचे उत्पादन झाले. यंदा खुल्या बाजारात हमीदरापेक्षा क्विंटलमागे ६०० रुपये कमी दर मिळत असल्याने हमीकेंद्रावर धान विक्रीस शेतकऱ्यांनी पसंती दिली. गत दीड महिन्यात जिल्ह्यातील २७ हमीभाव केंद्रांवरून २ हजार २७ शेतकऱ्यांकडून ७१ हजार ६९ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. .Paddy Procurement: सहकारी सोसायट्यांमार्फत भात खरेदी, शेतकऱ्यांना तत्काळ पैसे, केरळ सरकारचा निर्णय.२ हजार ३६९ हमीदराप्रमाणे १९ कोटी २० लाख ५२ हजार ५७९ रुपये इतकी याची किंमत आहे. साधारणतः पंधरवड्यात धान खरेदीचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. मात्र खरेदी प्रक्रियेला दीड महिन्याचा काळ लोटला तरी धान खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर न पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. खत, बियाणे, मजुरी, कर्जाचे हप्ते आणि घरखर्चासाठी पुन्हा कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवल्याचे चित्र आहे..शेतीमाल खरेदीची हमी ठरतेय डोकेदुखीशासनाने शेतीमालाची हमीदराने खरेदीची गॅरंटी दिली. मात्र यंत्रणेत अपेक्षित सुधारणा न करण्यात आल्याने शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींसह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांनी धान कापणी, बांधणी, मळणी व केंद्रावर पोहोचविण्यापासून तर मोजणीपर्यंत सर्व हिशेब नगदीत केला. .Paddy Procurement: धान खरेदीने उद्दिष्ट ओलांडले.हातात पंधरवड्यात पैसे मिळतील म्हणून उसनवारी करून व्यवहार भागविला. मात्र खरेदीला दीड महिना लोटूनही पैसे हातात पडले नसल्याने शासनाला धान विक्री करणे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना वेळ देत उद्दिष्टात १ लाख २६ हजार क्विंटलची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार किमान दोन लाख क्विंटल खरेदी करण्याची शासनाची यंदाच्या हंगामात तयारी असल्याचे सांगण्यात आले..पंधरा दिवसांच्या आत शेतकरी चुकारे जमा होणे अपेक्षित आहे. परंतु अद्याप शासनाकडून निधी मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सदर रक्कम अदा करता आली नाही. शासनाकडून रक्कम येताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने जमा केली जाणार आहे. या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे.- अजय बिसेन, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.