हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमी कीटकनाशक वापर या तत्त्वानुसार भाजीपाला उत्पादन घेता येते. पाण्याची ८० ते ९० टक्के बचत होते. तसेच पाण्याचा पुनर्वापर करता येतो. नियंत्रित वातावरणामध्ये आपण वर्षभर बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन घेऊ शकतो..New technologies used in smart farming: भविष्यातील शेती अधिक उत्पादनक्षम व शाश्वत करण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या इतर विविध निविष्ठांचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. वातावरणातील बदलांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक शेतीकडे वळणे गरजेचे आहे. आधुनिक शेती पद्धतीने भाजीपाला उत्पादन घेताना हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे..Smart Farming: संकल्पना शेडनेट हाउसची....या तंत्रज्ञानामध्ये विविध पद्धतींचा प्रामुख्याने वापर केला जातो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मातीविना शेती करणे शक्य आहे. परदेशामध्ये तसेच भारतामध्येदेखील काही प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. या तंत्रज्ञानामुळे कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमीत कमी कीडनाशकांचा वापर करून रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन घेता येते..जमिनीचे विभाजन आणि अयोग्य खत, पाणी व्यवस्थापनामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. अचानक होणारा वातावरणातील बदलाचा परिणाम पीक उत्पादनावर दिसत आहे. या सर्वांना एक पर्यायी तंत्रज्ञान म्हणजे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मातीविना शेती करणे आणि कमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमी कीटकनाशक वापर या तत्त्वांचा वापर करून भाजीपाला उत्पादनाचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे..Smart Farming: जागृतपणे शेती केल्यास फायदेशीर: पाटील.हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदेकमी जागा, कमी खत, कमी पाणी व कमी कीटकनाशक वापर या तत्त्वानुसार भाजीपाला उत्पादन घेता येते.संशोधनातून असे सिद्ध झाले आहे, की हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून पाण्याची ८० ते ९० टक्के बचत होते. यामध्ये पाण्याचा पुनर्वापर करता येतो.नियंत्रित वातावरणामध्ये आपण वर्षभर बिगर हंगामी भाजीपाला उत्पादन घेऊ शकतो..रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन घेण्यास सोईस्कर पद्धत आहे. या उत्पादनांना बाजारामध्ये चांगली किंमत मिळते.या पद्धतीमध्ये भाजीपाला वाढीचा वेग जास्त असतो, कीड व रोगांचे प्रमाण कमी आढळते.पर्यावरणाचा ऱ्हास कमी होतो. टेरेस गार्डन किंवा रुफ टॉप गार्डनमध्ये याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे.जमिनीतील उत्पादनापेक्षा ३ ते ४ पटीने भाजीपाला उत्पादन जास्त मिळते..या तंत्रज्ञानामुळे सर्व जीवनसत्त्वयुक्त व चवदार भाज्यांचे उत्पादन घेता येते.मातीविना शेती असल्यामुळे यामध्ये जमिनीतून येणारी बुरशी, कीड व तणांचा प्रादुर्भाव यामध्ये होत नाही.कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेता येते.हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून सर्व पालेवर्गीय भाजीपाला तसेच परदेशी भाजीपाला उदा. पालक, लेट्युस, सेलरी, पार्सली, लीक, बेसील, मिंट, लेमनग्रास, ब्रोकोली, लाल कोबी, मेथी, कोथींबीर लागवड करता येते. फळभाज्यांमध्ये टोमॅटो, चेरी टोमॅटो, काकडी, खरबूज इत्यादी भाजीपाला पिके आणि औषधी वनस्पतींचे उत्पादन घेणे शक्य आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.