Satara News: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळाचा नारा देत संपूर्ण जिल्ह्यावर वर्चस्व गाजवण्याचे भाजपचे स्वप्न जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी धुळीस मिळविले आहे. ६५ पैकी केवळ २७ जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने २० जागा आणि शिवसेनेने १५ जागा जिंकत अनपेक्षित मुसंडी मारली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ‘बाणा’त अडकल्या आहेत..भाजपने महायुतीतील मित्रपक्षांना बाजूला सारून स्वबळावर लढण्याचा पवित्रा घेतला होता. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना आव्हान दिले. मात्र, मतदारांनी भाजपला २७ जागांवर रोखले..Satara ZP: सातारा ‘झेडपी’त त्रिशंकू स्थिती.बहुमतासाठी आवश्यक ३३ या आकड्यापासून भाजप अजूनही सहा पावले दूर आहे. ११ पैकी केवळ कऱ्हाड, सातारा, खटाव पंचायत समित्यांमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. तर कोरेगाव, खंडाळा, वाईत राष्ट्रवादीला बहुमत मिळाले आहे. तर जावळी, माण, महाबळेश्वर, फलटण पंचायतीत समसमान बलाबलामुळे ईश्वरी चिठ्ठीवर ठरणार सभापती ठरणार आहे..पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या ‘कोयना दौलत’ निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते मकरंद पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात झालेल्या बैठकीत भाजपला रोखण्याची गुप्त योजना ठरली होती. त्याचे परिणाम निकालातून स्पष्ट दिसत आहेत. शिवसेनेने १५ जागा जिंकून सत्तेत आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. तर राष्ट्रवादीला २० जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच वर्णे गटातून राजू शेळकेच्या रूपाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एन्ट्री झाली आहे..Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार.सत्तेची गणिते : कोण होणार अध्यक्ष?जिल्हा परिषदेत कोणाचेही स्पष्ट बहुमत नसल्याने आता ‘तडजोडी’च्या राजकारणाला वेग येणार आहे : भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या १५ सदस्यांच्या पाठिंब्याची नितांत गरज आहे. जर राष्ट्रवादी (२०), शिवसेना (१५) आणि काँग्रेस (१) एकत्र आले, तर हा आकडा ३६ वर जातो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे..तालुकानिहाय चित्र : कुठे कोण भारी?भाजपचा प्रभाव : सातारा (५/८), कऱ्हाड (८/१२) आणि खटावमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली.शिवसेनेची बाजी : पाटणमध्ये शंभूराज देसाईंनी ६ जागा जिंकून एकहाती वर्चस्व राखले, तर फलटणमध्ये ५ जागांसह किंगमेकरची भूमिका बजावली..राष्ट्रवादीचे अस्तित्व : कोरेगाव, माण आणि वाई तालुक्यात राष्ट्रवादीने भाजपला कडवी झुंज देत आपले जागाबळ टिकवून ठेवले आहे.निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकलेले महायुतीचे नेते आता सत्तेसाठी पुन्हा एकत्र येतात की राष्ट्रवादी-शिवसेना नवी आघाडी करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तुर्तास, जिल्हा परिषदेचा ‘रिमोट कंट्रोल’ शंभूराज देसाई यांच्या हाती असल्याचेच दिसत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.