Organic Fertilizer : शेणखताचा वापर कसा कराल?

FYM Use : जमिनीची सुपीकता जर टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचा आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो.
FYM Use
FYM Use Agrowon

Organic Farming : जमिनीची सुपीकता जर टिकवून ठेवायची असेल तर  सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्वाचा आहे. जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. आपल्याकडे सेंद्रिय खतामध्ये जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो.

कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे घरची जनावरे असतात. या जनावरांकडून घरचे शेणखत उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी हे शेणखत उकिरड्यातून उपसून थेट शेतात पसरतात. पण  हे शेणखत व्यवस्थीत कुजलेले नसत. त्यामुळे या शेणखताचा पिकाला फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होत.

शेणखताचे फायदे

काही शेतकऱ्यांना वाटत शेतात शेणखत टाकल की झाल आता जमिनीला काही देण्याच गरज नाही पण तस नाही. रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण हे कमी असतं. पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थांच प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होत.

थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करत. शेणखतामुळे जमिनीत ॲझेटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू यासारखे अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू वाढतात. तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांडुळांचही प्रमाण वाढत.

पिकाच्या पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होते. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात. पण हे फायदे तेंव्हाच मिळतात जेंव्हा शेणखत व्यवस्थित कुजलेल असेल.

FYM Use
Fertilizers : विद्राव्य खतांचा वापर कसा कराल?

शेणखत जर व्यवस्थित कुजलेल नसेल तर काय होत

शेणखत जर व्यवस्थित कुजलेल नसेल तर शेणखत शेतात पसरविल्यानंतर कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताच तापमान वाढून जमिनीती मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा पिकाच्या मुळाला शॉक बसतो. त्यामुळे उत्पादनात घट येते.

अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हुमणी भुंगेरावर्गीय किडींची अंडी, अळ्या असतात. कुजणाऱ्या शेणात  मररोग, मूळकूज, करपा या रोगांसाठी कारणीभूत, बुरशी वाढू शकते. त्यामुळे पूर्णपणे कुजलेले शेणखतच वापरावे.

शेणखत कुजविण्यासाठी उपाय

शेणखत चांगले कुजवण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. कंपोस्ट कल्चर शेणखतावर टाकून शेणखत चांगले खाली-वर करावे.  प्रति टन शेणखतासाठी एक किलो किंवा एक लिटर कंपोस्ट कल्चर पुरेस होत.  

शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा. हे घटक शेणखतावर टाकून शेणखत चांगल खालीवर करुन मिसळून घ्याव.

यासोबतच शेणखतामध्ये खूप जास्त प्रमाणात शेणकिडे असतात. या शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझिम ॲनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा. त्यात ओलसरपणा राहील इतके पाणी शिंपडावे.

शेणखताचा वापर

शेणखताचा वापर करताना जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणीआधी हेक्‍टरी ५ ते १० टन शेणखत मिसळाव. तर भाजीपाला रोपवाटिकेमध्ये गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करावा. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी १०-१५ टन शेणखत द्यावे. अशाप्रकारे शेणखत वापरताना काळजी घेतली तर शेणखताचा नक्कीच फायदा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com