Pest Disease Management: सध्या अनेक भागांत ढगाळ वातावरण, कमी जास्त सूर्यप्रकाश, आर्द्रतेत वाढ आणि अचानक पाऊस अशी परिस्थिती दिसत आहे. अशा हवामानाचा थेट परिणाम द्राक्षाच्या बागेवर होतो. रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढतो, तसेच पावसामुळे मणी तडकणे आणि गळ होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी बागेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे..भुरी रोगाकडे विशेष लक्ष द्याढगाळ वातावरण आणि थंडी एकत्र आल्यास भुरी रोगासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार होते, विशेषतः ज्या भागात पाऊस झाला आहे तिथे धोका जास्त असतो. त्यामुळे बागेची दर दोन-तीन दिवसांनी पाहणी करावी. आतल्या कॅनॉपीतील पाने उलटवून पाहावीत, तसेच ओलांड्याला चिकटलेले घड तपासावेत. एखाद्या पानावर जरी भुरी दिसली, तरी संपूर्ण बागेत धोका आहे असे समजून तात्काळ फवारणी करावी. वाऱ्याच्या दिशेने असलेल्या शेजारच्या बागांमधूनही भुरीचे बीजाणू येऊ शकतात, त्यामुळे त्या बाजूकडील निरीक्षण महत्त्वाचे ठरते..Grape Cold Stress: द्राक्षबागेत अतिथंडीचा फटका! सोप्या उपाययोजनांनी पिकाचे संरक्षण शक्य.भुरीसाठी उपायगेल्या १० ते १५ दिवसांत सल्फर अधिक कायटोसॅन फवारणी केली असल्यास लगेच पुनरावृत्तीची गरज नाही. वातावरण दमट असल्यास जैविक उपाय प्रभावी ठरतात. जैविक बुरशीनाशकामध्ये ट्रायकोडर्माची फवारणी फायदेशीर ठरू शकते. भुरी व लाल कोळी दोन्हींसाठी सल्फरची 2 ग्रॅम प्रति लिटर फवारणी उपयुक्त आहे..लाल कोळी व मिली बग नियंत्रणआर्द्रतेतील चढउतार आणि आधीची कोरडी हवा यामुळे काही बागांमध्ये लाल कोळी वाढताना दिसतात. आधी सल्फर फवारणी केली असल्यास त्यावर नियंत्रण मिळते. तरीही पाने उलटवून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. मिली बगसाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने जैविक बुरशीयुक्त कीटकनाशक सुचविले आहेत. यामध्ये मेटारायझिम अॅनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना आणि व्हर्टिसिलिअम लेकॅनी यांचा ढगाळ व दमट वातावरणात या जैविक फवारणीचा चांगला परिणाम मिळतो..बागेतील आर्द्रता नियंत्रणढगाळ हवामानात बागेत जास्त ओलावा टिकून राहतो, जो रोगांसाठी पोषक ठरतो. त्यामुळे बागेतले आर्द्रतेचे नियंत्रण करणे गरजेचे असते. यासाठीअनावश्यक दाट कॅनॉपी कमी करावी. झाडांमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी..Grape Cold Stress: अति थंडीमुळे द्राक्ष पिकात कोणत्या समस्या येतात?.पावसाची शक्यता असल्यास करायचे व्यवस्थापनहवामानाच्या अंदाजात पावसाची शक्यता सांगितल्यावर पाऊस येण्यापूर्वी बागेतील पाणी देणे बंद किंवा कमी करावे. शक्य असल्यास बोदावर प्लास्टिक आच्छादन करावे, जेणेकरून मुळांना जास्त पाणी मिळणार नाही. नाशिक व उत्तर भागात काढणीयोग्य द्राक्षे तयार असतील तर पावसाआधी काढणी पूर्ण करावी. प्लास्टिक कव्हर वापरणार असाल तर ते आधीच उभे करावे..पाऊस पडल्यानंतरउघडीप मिळताच शेतातील साचलेले पाणी बाहेर काढावे. त्वरित निचऱ्याची व्यवस्था करावी. बागेत पाणी साचून राहिल्यास मुळे नीट काम करत नाहीत, पाणी शोषण कमी होते आणि झाड कमकुवत होते..मणी तडकणे व गळ रोखण्यासाठीपावसानंतर सापेक्ष आर्द्रता खूप वाढते. त्यामुळे पानांतून होणारे बाष्पोत्सर्जन कमी होते आणि जादा पाणी मण्यांकडे जाते. आतून दाब वाढल्याने मणी तडकतात किंवा गळतात. यावर उपाय म्हणून मण्याची साल मजबूत व लवचिक राहण्यासाठी कॅल्शिअमची फवारणी उपयुक्त ठरते. मात्र जर आधीच जिब्रिलिक अॅसिड व सायटोकायनिन वापरून मण्यांची जास्त फुगवण झालेली असेल, तर कॅल्शिअमचा फारसा फायदा होत नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.