Pune News: राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी शेळीपालन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत माडग्याळ, दख्खनी व स्थानिक प्रजातींच्या १० शेळ्या व १ बोकड किंवा १० मेंढ्या व १ नर मेंढाच्या एकूण किंमतीवर महिला व अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के तर खुल्या व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के अनुदान मिळणार आहे. उर्वरित खर्च शेतकऱ्यांनी स्वतःकडून किंवा बँक कर्जातून उभारावा लागणार आहे. योजनेअंतर्गत बँक कर्जाची सुविधा तसेच शेळीपालनाबाबत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. .या योजनेत लाभार्थ्यांना वातावरणाशी सुसंगत अशा प्रजातींच्या १० शेळ्या व १ बोकड किंवा १० मेंढ्या व १ नर मेंढा असे गट वाटप करण्यात येतो. योजनेत लाभार्थी निवडताना दारिद्र्यरेषेखालील शेतकरी, महिला बचत गटातील सदस्य, अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक आणि नोकरीच्या शोधात असलेले सुशिक्षित बेरोजगार यांना प्राधान्य दिले जाते..Agriculture Scheme: शेतकऱ्यांना रोपवाटीकेसाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार .विशेषत: महिला बचत गटांना अनुदान व प्रशिक्षण मिळते, ज्यामुळे शेतकरी आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. या योजनेतून शेतकऱ्यांना शेळीपालन सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळते, दूध आणि मांस विकून उत्पन्न वाढवता येते, व्यवसायातून रोजगार मिळतो आणि शेळीपालनाचे ज्ञान व कौशल्य मिळते..योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणे, शेळी-मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.योजनेचे अनुदानमहिला प्रवर्गासाठी भज-क या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातींना प्राधान्य.प्रत्येक महिला सदस्याला या योजनेअंतर्गत १० शेळ्या + १ बोकड असलेला शेळी गट व १० मेंढ्या + १ नर मेंढा असलेला मेंढी गट देण्यात येतो.शेळी गट (उस्मानाबादी/संगमनेरी) : यासाठी १ लाख ३ हजार ५४५ रुपये किंमत निश्चित असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५१ हजार ७७३ तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ७७ हजार ६५९ रुपयांइतके अनुदान देण्यात येणार आहे.शेळी गट (स्थानिक जाती) : यासाठी किंमत ७८ हजार २३१ रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गाला ३९ हजार ११६ तर अनुसूचित जाती-जमातींना ५८ हजार ६७३ रुपये अनुदान मिळेल.मेंढी गट (माडग्याळ) : याची किंमत रु. १ लाख २८ हजार ८५० रुपये असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६४ हजार ४२५ तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ९६ हजार ६३८ रुपये अनुदानाचा लाभ देण्यात येईल.मेंढी गट (दख्खनी/स्थानिक) : साठी किंमत १ लाख ०३ हजार ५४५ असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५१ हजार ७७३ आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी ७७ हजार ६५९ इतके अनुदान मिळणार आहे..BhauSaheb Fundkar Scheme: शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी मिळणार १०० टक्के अनुदान.शेतकऱ्यांना फायदेशेतकऱ्यांना शेळीपालन सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते.अधिक शेळ्या खरेदी करून व्यवसाय वाढवता येतो.दूध आणि मांस उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते.शेतकऱ्यांना पशुपालनाचे ज्ञान आणि कौशल्य शिकता येते..अटी व नियमअर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावायाआधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावाएका कुटुंबातील फक्त एका सदस्याला लाभपशुपालनासाठी स्वतःची जागा व चाऱ्याची व्यवस्था असावीवय १८ ते ५५ वर्षांच्या दरम्यानमागील ५ वर्षांत पशुसंवर्धन विभागाच्या इतर योजनांचा लाभ घेतलेल्यांना अपात्रताशेळीपालन प्रशिक्षण घेतलेले असणे आवश्यकअर्जदाराकडे स्वतःची जमीन असणे बंधनकारकशेळी/मेंढीपालनाचा अनुभव असल्यास प्राधान्यअनुसूचित जाती/जमातीसाठी जात प्रमाणपत्र आवश्यकआधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक.आवश्यक कागदपत्रेशेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्डजात प्रमाणपत्र, दारिद्र्य दाखला (असल्यास)ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखलाराष्ट्रीयकृत बँक खाते तपशीलप्रशिक्षण प्रमाणपत्रपासपोर्ट साइज फोटो, रेशनकार्ड, वीज बिलहमीपत्र.अर्ज प्रक्रियाअर्ज ऑनलाइन maharashtra.gov.in वर करता येईलकिंवा ऑफलाइन सर्व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून ग्रामपंचायत कार्यालय/जिल्हा कार्यालयात सादर करावा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.