Nursery Labor Management : रोपवाटिकेतील मजुरांचे योग्य व्यवस्थापन कसे करावे?

Nursery Management : रोपवाटिकेत मजुरांची गरज कमी जास्त असते, तसेच त्यांच्या काही अडचणीही असतात. त्यामुळे मजूर व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे.
Nursery labor Management
Nursery labor ManagementAgrowon
Published on
Updated on

Nursery Business : कोणत्याही उद्योग धंद्याप्रमाणे रोपवाटिका हा सुद्धा एक व्यवसाय समजला जातो. तसेच रोपवाटिकेत वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करण्यासाठी मजुरांची गरज भासते. हे मजूर वेगवेगळ्या प्रकारचे असतात व त्यासाठी मजुरीचे वेगवेगळे दरही असतात.

रोपवाटिकेत मजुरांची गरज कमी जास्त असते, तसेच त्यांच्या काही अडचणीही असतात. त्यामुळे मजूर व्यवस्थापन ही एक महत्त्वाची बाब आहे. पावसाळ्यात कलमे - रोपांची आगाऊ मागणी नोंदवून काही तरतुदी केल्या तर पाऊस पडल्यानंतर एकदम मागणी वाढते.

त्या काळात धांदल उडत नाही व कमी मजुरीत काम करता येते. मजुरांची उपलब्धता व त्यातील अडचणी यांचा परिणाम रोपवाटिकेच्या उत्पादनावर व उत्पन्नावर होतो. मजुरीवरील एकूण खर्च २५ टक्के तर व्यवस्थापनाचा खर्च ३० टक्केच्या आत असावा. मजूर व्यवस्थापनात पुढील बाबी महत्त्वाच्या समजल्या जातात...

- गरजेप्रमाणे मजूर कामावर ठेवावेत. कमी मजुरांकडून अधिक काम करवून घेणे तसेच अधिक मजुरांकडून कमी काम करून घेणे टाळावे.

- बालमजूर, नेहमी आजारी पडणारे मजूर, व्यसनी मजूर, हट्टी मजूर, भांडखोर, चुगलखोर, भुरटे, अनियमित वागणारे अशांना मजूर म्हणून कामावर ठेवणे टाळावे.

- मजुरी वेळेवर व नियमितपणे द्यावी.

Nursery labor Management
Vegetable Nursery : भाजीपाला रोपवाटीका कशी तयार कराल?

- मजुरांना अडीअडचणीत आर्थिक मदत करावी.

- प्रामाणिक मजुरांना जादा केलेल्या कामाचा ओव्हर टाइम अगर वेगळा मोबदला द्यावा.

- मजुरांच्या शैक्षणिक, आरोग्य विषयक, सामाजिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा.

- रोपवाटिकेतील कामे सुलभ होण्यासाठी काही सुविधा द्याव्यात. उदाहरणार्थ - सावली, पिण्याचे पाणी, मधली सुट्टी, विश्रांती इत्यादी.

- एखाद्या कामात मध्येच बदल करू नये. तसेच एकाच कामावरील मजूरही वारंवार बदलू नयेत.

- मजुरांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊ नये.

- मजुरांचाही काही बाबतीत सल्ला घ्यावा. त्यांना विश्‍वासात घ्यावे. इतर बाबीमुळे होणारे नुकसान मजुरांवर ढकलू नये. मजुरांना मार्गदर्शन करावे, त्यांची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न करावेत. मजूरविषयक कायद्याचे पालनही करावे.

- ही सर्व कामे अथवा या बाबी वरवर जरी सहज व सोप्या वाटत असल्या तरी त्यांची अंमलबजावणी करणे अवघड व कुशलतेचे काम आहे. हे ज्या रोपवाटिकेत साध्य होते, ती रोपवाटिका निश्‍चिती शाश्‍वत फायद्याची ठरते.

लेखक - प्रा. प्रवीण सरवळे, डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती, जि. पुणे (९७६७८३८१६५)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com