
Cuscuta Weed Control : मरवेल हे कंदमूळ वर्गातील पर्णहीन, पिवळसर रंगाचे तण आहे. या तणाच्या सुमारे १७० प्रजाती आहेत. हे तण संपूर्ण परोपजीवी असून, द्विदल वनस्पतींवर अवलंबून राहते. मिरची, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा तसेच कांदा पिकावर अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो.
मागील काही वर्षांत अमरवेल किंवा अधरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदलवर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाल्यावस्थेत हा वेल गुंडाळी करून दुसऱ्या वनस्पतीच्या खोडावर चिटकतो व जमिनीपासून वेगळा होतो.
त्यानंतर सूक्ष्म दातासारख्या तंतूच्या मदतीने त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते. परिणामी उत्पादनात मोठी घट येते.
- अमरवेलाचे बी २० वर्षांहून अधिक काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते. त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेपूर्वी त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
- या तणाच्या बीला उगवणीसाठी अनुकूल १५ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते.
- बी आकाराने १ ते दीड सेंमी इतके असते. वेल पूर्णतः मूळरहित असून पिवळसर, नारिंगी व पानेविरहित दोऱ्यासारखा दिसतो.
- मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून २.५ ते ५ सेंमी दूरवरील द्विदल वनस्पतीवर चिकटतो. परंतु परिसरात द्विदल वनस्पती नसली तरी रोप ८ ते १० दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकते.
- एक अमरवेल प्रतिदिन साधारण ७ सेंमीपर्यंत वाढून जवळपास ३ चौ.मी. क्षेत्र व्यापतो.
- साधारणतः ६० व्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची क्रिया सुरू होते.
- या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत देखील नुकसान होऊ शकते. मूग व उडीद ३१ ते ३४ टक्के, टोमॅटो ७२ टक्के, हरभरा ८५.७ टक्के व मिरची पिकात ६० ते ६५ टक्के उत्पादनात घट आढळून आली आहे.
व्यवस्थापन ः
अमरवेल या तणाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त भागात सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक, निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतींचा वापर प्रभावी तणनियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.