थोडक्यात माहिती...१. शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान दोनदा पिकाचे निरीक्षण करावे.२. पानांचा रंग, आकार व वाढ तपासून अन्नद्रव्य कमतरता वेळीच ओळखावी.३. पाने खाल्ली, गुंडाळली किंवा चिकट दिसल्यास कीड-रोगाचा प्रादुर्भाव असू शकतो.४. ओलावा, तण व पाण्याचा निचरा यावर नियमित लक्ष द्यावे.५. कीड-रोग दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषध वापरावे..Farming Tips: सोयाबीन हे राज्यातील मुख्य पिकांपैकी एक आहे. पीक वाढीच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे सोयाबीनवर कीड रोग किंवा अन्नद्रव्यांची कमतरता अशा समस्या आढळतात. चांगले उत्पादन मिळवायचे असल्यास पिकाची काळजी घेणे आणि वेळोवेळी निरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. पिकावर कीड, रोग किंवा अन्नद्रव्यांची कमतरता दिसल्यास तर लगेच उपाय करता येतात. या सर्व गोष्टी शेतकरी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने करु शकतात..सोयाबीन निरीक्षण कसे करावेशेतकऱ्यांनी आठवड्यातून दोनदा शेतातील विविध भागांना फेरफटका मारावा. शेतातील वेगवेगळ्या भागातून झाडे तपासावेत. पिकांच्या पानांचा रंग, आकार व वाढ यांची तुलना करावी. .कीड निरीक्षणपीक वाढीच्या काळात सोयाबीन पिकावर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. झाडांवर छिद्रे, जाळीदार पाने किंवा खाल्लेली, गुंडाळलेली पाने, विष्टा, किंवा अळी दिसल्यास पानेखाणाऱ्या अळ्या, घाटे अळीचा प्रादुर्भाव असू शकतो.सापडलेल्या किडी, अळी हाताने वेचून नष्ट कराव्यात, किंवा योग्य कीटकनाशकाचा वापर करावा.मावा, पांढरी माशी, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव झाल्यास पानांवर काळे डाग, चिकटपणा, किंवा वाकलेली पाने दिसतात..Soybean Stem Borer Control: सोयाबीनवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा करा नायनाट; वाचा संपूर्ण माहिती.रोगांचे निरीक्षणरोग ओळखताना पानांवर पिवळ्या किंवा करड्या रंगाचे डाग, खोड कुजणे, शेंगांवर डाग, पान गळणे, कळीवर डाग दिसतात, त्यांच्यावर लक्ष द्यावे.पिवळसर मोज़ॅक किंवा अँथ्रॅक्नोज असे रोग सोयाबीनला जास्त त्रास देतात.कीड रोगाच्या निरीक्षणासाठी १० झाडे निवडून त्यावर किती किडी दिसतात याची मोजणी करुन घ्या. रोग दिसल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि योग्य औषध वापरा..अन्नद्रव्यांच्या कमतरतेची ओळखनत्र कमी असल्यास पाने पिवळी पडतात तर पालाश कमी असल्यास कडेला जळल्यासारखी होतात. लोहाच्या कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात, शिरा हिरव्या तर बाकीचा भाग पिवळा दिसतो. हरितद्रव्याचा अभाव होतो आणि पिकाची वाढ कमी करतो. नत्र, स्फुरद, पालाश यांच्या कमतरतेमुळे वाढ खुंटते, पानांची रंग वगळते, काहीवेळा पानांच्या कडेने तपकिरी डाग दिसतात.झिंक, बोरॉन सारखी सूक्ष्मद्रव्ये कमी पडल्यास वाढ खुंटते, यासाठी वेळेवर फवारणी करावी..निरीक्षण आणि व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या बाबी-पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर झाडांची उंची, शाखा, शेंगा व फुले तपासावीत. वाढ नीट होत नसल्यास माती किंवा पाण्याचीही समस्या असू शकते. शेतातील तण वेळेवर काढत रहावे. शेतात पाणी साचू देऊ नये. पाण्याचा निचरा नीट होत आहे का, याची सहसा खात्री करून घ्यावी.मातीतील ओलावा आणि भेगा यावरही लक्ष द्या. सर्वेक्षणात दरवेळी कीड-रोग किंवा अन्नद्रव्य कमतरता दिसली तर तत्काळ स्थानिक कृषी तज्ञ किंवा अधिकारी किंवा सल्लागार यांना संपर्क साधावा..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):१. सोयाबीन पिकाचे निरीक्षण किती वेळा करावे? प्रत्येक आठवड्यातून किमान दोनदा सोयाबीन पिकाचे निरीक्षण करावे.२. सोयाबीनवरील कीड-रोगाची लक्षणे कशी ओळखता येतात? पाने खाल्ली जाणे, चिकटपणा, काळे डाग, पान गळणे अशी लक्षणे दिसतात.३. अन्नद्रव्यांची कमतरता सोयाबीनमध्ये कशी ओळखायची? पाने पिवळी होणे, कडेने जळल्यासारखी होणे, शिरा हिरव्या राहून बाकी पिवळसर दिसणे, या लक्षणांवरून अन्नद्रव्यांची कमतरता ओळखावी.४. सोयाबीन पिकावर सर्वाधिक कोणते रोग होतात?पिवळसर मोज़ॅक आणि अँथ्रॅक्नोज हे प्रमुख रोग आहेत.५. कीड-रोग दिसल्यास शेतकऱ्यांनी काय करावे? लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य औषधांचा वापर करावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.