Soybean Karpa Disease: सोयाबीनवरील (अँथ्रॅकनोज) करपा रोगाचे व्यवस्थापन
Anthracnose Disease Management: मराठवाड्यात सोयाबीनवरील करपा (अँथ्रॅकनोज) रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोलेक्टोट्रीकम डिमॅटियम बुरशीमुळे होणारा हा रोग पानांवर, शेंगांवर ठिपके निर्माण करून उत्पादनात मोठी घट करतो. स्वच्छ बियाणे, प्रतिकारक्षम वाण आणि शिफारस असलेले बुरशीनाशक फवारणीने रोगावर नियंत्रण मिळवता येते.