Sugarcane Production Tips: सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी सुरू आहे. ऊस तोडणी झाल्यानंतर त्याचा खोडवा ठेवला जातो. खोडव्यामध्ये लागणीच्या ऊसापेक्षा ३५ ते ४० टक्के खर्च कमी येतो. त्यामुळे खोडव्याचे शाश्वत उत्पादन येण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे खूप आवश्यक आहे. या तंत्रात बुडखा छाटणी, पाचट व्यवस्थापन, बगला फोडणे आणि नांग्या भरणे योग्य पद्धतीने भरल्यास उत्पादनात वाढ होते..बुडखा छाटणीचांगल्या उत्पादनासाठी खोडवा ऊसाचा डोळा जमिनीतूनच उगवणे आवश्यक असते, त्यामुळे जमिनीलगत ऊस तोडणी होणे अत्यंत आवश्यक आहे.जमिनीच्या वर २ ते ३ कांड्या ठेवून तोडणी केल्यास खोडवा पिकाची उगवण कमी होते आणि हेक्टरी उत्पादन घटते.कांड्यांमध्ये कांडी कीड, खवले किडीचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते.जमिनीवर राहिलेल्या कांड्यांवरील डोळे प्रथम फुटतात आणि कांडीत साठलेल्या रसावर वाढतात, परंतु मुळांची वाढ न झाल्याने नंतर हे फुटवे मरून जातात..Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान.त्यामुळे ऊस तोडणी झाल्यानंतर बुडखे जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटावेत, जेणेकरून उगवण जमिनीतूनच सुरू होईल.जमिनीलगत बुडखा छाटणी केल्यास फुटवे जमिनीतून उगवतात, मुळांद्वारे अन्नद्रव्ये व पाणी सहज शोषले जाऊन खोडवा चांगला वाढतो.जमिनीलगत छाटलेल्या बुडख्यावर १ ग्रॅम बावीस्टीन + ०. ३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड (७०%) आणि एक लिटर पाणी असे प्रमाण घेऊन फवारणी करावी..पाचट व्यवस्थापनऊस तुटून गेल्यानंतर शेतामध्ये राहिलेले पाचट न जाळता त्याचा शेतात आच्छादनासाठी उपयोग करावा, सर्व सऱ्यांमध्ये पाचटाचे आच्छादन करावे. पाचटाचे आच्छादन केल्यास मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढून मातीची सुपीकता आणि उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच मातीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.वरंबे मोकळे राहतील याची काळजी घ्यावी अन्यथा फुटवे कमी फुटतात.हेक्टर ८ ते १० टन पाचट निघते याचा सेंद्रिय खत म्हणून चांगला उपयोग होतो.शेतामध्ये ऊस पाचट कुजविण्यासाठी हेक्टरी ८० किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व २.५ लिटर पाचट कुजविणारे द्रवरूप जिवाणू वापरले तर पाचट लवकर कुजते..बगला फोडणेपहिल्या पिकाची मुळे जुनी व जीर्ण झालेले असल्यामुळे ती अकार्यक्षम झालेली असतात. जुनी मुळे तोडण्यासाठी तसेच जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर ८ ते १० दिवसात बगला फोडाव्यात.बुडखा छाटल्यानंतर जमीन वापस्यावर असताना किंवा हलकी, मध्यम जमीन जास्त कोरडी असल्यास हलकेसे पाणी देऊन नांगरणे बगला फोडून घ्याव्यात बगला फोडल्यामुळे जुनी मुळे तुटून नवीन मुळांच्या संख्येत चांगली वाढ होते. ही मुळे फार कार्यक्षम असतात..Drip Irrigation for Sugarcane: खोडवा उसासाठी ठिबकद्वारे पाणी, अन्नद्रव्य व्यवस्थापन.नवीन मुळे जमिनीतील अन्नद्रव्य व पाणी शोषून घेऊन फुटव्यांच्या जोमदर वाढीसाठी मदत करतात.जमीन ६ ते ७ दिवस उन्हात तापू द्यावी व नंतर वरखते देऊन दातेरी कुळव चालवावा यामुळे खते मातीत मिसळतात व नंतर पाणी द्यावे.पारंपरिक लागण पद्धतीमध्ये पाचट आच्छादन करून रिकाम्या राहिलेल्या एकाड एक सरी मधील बगला अंकुश नांगराने फोडाव्यात..नांग्या भरणेऊसाचे उत्पादन हे एकरी ऊसांची संख्या आणि एका ऊसाचे वजन यावर अवलंबून असते.चांगले उत्पादन मिळवण्यासाठी एकरी ४०,००० ऊस असणे आवश्यक आहे. त्यामुळे विरळ ऊस असलेल्या ठिकाणी नांग्या भरून घेणे आवश्यक आहे.ऊस तोडणी नंतर १५ ते २१ दिवसाच्या दरम्यान नांग्या भरण्याचे काम करावे..नांग्या भरते वेळेस रोपाचे वय दीड महिन्याचे असावे.रोपांची वरील पाने कात्रीनेच कापावीत. हाताने तोडू नयेत. वाढणारा शेंडा कापू नये.नांग्या भरल्यावर रोप जगेपर्यंत एक आड एक दिवस हलके पाणी द्यावे.नांग्या भरण्यासाठी खोडव्यातील दाट असलेल्या ठिकाणच्या बेटाचा वापर सुद्धा करता येतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.