
Animal Care : दूध उत्पादनात भारत पहिल्या स्थानी असला तरी दुधाच्या उत्पादन क्षमतेत आपण जगाच्या खूपच मागे आहोत. त्यामुळे आपल लक्ष हे दुधाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर असण गरजेचे आहे. फायदेशिर दुग्ध व्यवसायासाठी डेअरी व्यवसायाच अर्थकारण समजून घेण गरजेच आहे. त्यासाठी काय कराव लागेल? याविषयी पशुपोषण तज्ज्ञ आणि ए. बी व्हिस्टा चे सेल्स डिरेक्टर डॉ. दिनेश भोसले यांनी दिलेली माहिती पाहुया.
चांगल्या प्रतीच्या गाईंचा अभाव, चुकीच्या पद्धतीने खाद्य व्यवस्थापन यामुळे दुग्धव्यवसाय दिवसेंदिवस तोट्यात चालला आहे. दुधाला कमी दर हा विषय ऐरणीवर असला तरीही दुधाची उत्पादकता आणि गुणवत्तेत वाढ याशिवाय हा व्यवसाय शाश्वत होऊ शकणार नाही. याचाच विचार करून भविष्यात या व्यवसायात आमूलाग्र बदल करावे लागणार आहे. यामध्ये दुग्ध व्यवसाय फायदेशिर करण्यासाठी गायी फायद्याच्या की म्हशी?, एक लिटर दूधामागे किती खर्च येतो? आणि फायदेशिर व्यवसायासाठी घरच्याघरी पशुखाद्य तयार कराव का? या गोष्टींचा विचार होण गरजेच आहे.
गायी फायद्याच्या की म्हशी?
भारतात ५५ टक्के दूध म्हशीपासून आणि ४५ टक्के दूध गायीपासून मिळत. दुग्ध व्यवसायासाठी गायी घ्यायच्या की म्हशी हे ठरत तुम्हाला दूध कुठे विकायच आहे यावर. कारण म्हशीच दूध तुम्ही थेट ग्राहकाला विकू शकता पण गायीच दूध तुम्ही थेट ग्राहकांना विकू शकत नाही. स्थानिक डेअरी द्वारे हे दूध गोळा करुन ग्राहकांपर्यंत जात.
म्हैस दूध कमी देते आणि गाय जास्त दूध देते. पण म्हशीच्या दुधात फॅट च आणि एसएनएफ च प्रमाण हे गायीच्या दुधापेक्षा जास्त असत. म्हणजे म्हशीच दूध हे घट्ट असतं. त्यामुळे म्हशीच्या दुधाला भाव जास्त मिळतो. गायी, म्हशीच्या दुधातील हा फरक लक्षात घेतला पाहिजे. संकरित गाय पाळायची असेल तर ३ ते ५ हजार लिटर दूध एका वेता मध्ये मिळत. तर देशी गायीपासून एका वेतामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध एका वेतामध्ये मिळत. हे लक्षात घ्या.
तुम्ही जर म्हैस पाळणार असाल तर ही म्हैस तुम्हाला ८ ते १० महिन्यामध्ये हजार ते दोन हजार लिटर दूध देते. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही ठरवायच की, तुम्हाला गायी पाळायच्या आहेत की म्हशी. तसच तुमच्या गावात जास्त म्हशी आहेत की जास्त गायी आहेत. या वरुन सुद्धा तुम्ही ठरवू शकता. उन्हाळ्यात म्हशींना उष्णतेचा जास्त त्रास होतो. तुमच्या भागात जर उन्हाळा जास्त तीव्र असेल तर अशावेळी तुमच्या कडे पाण्याची व्यवस्था कशी आहे? म्हशींना पाणी उपलब्ध होईल का? अशा गोष्टीचा विचार करावा.
एक लिटर दूधामागे किती खर्च येतो?
आपला दुग्ध व्यवसाय फायद्यात आहे की? तोट्यात? हे शोधून काढायच असेल तर एक लिटर दुधाचा खर्च काढता आला पाहिजे. एक लिटर दुधाचा खर्च काढायचा असेल तर गायीची किंमत, तिला दिल जाणार खाद्य, औषधांचा खर्च, गोठ्यामध्ये गायींसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू या मध्ये मिल्कींग मशीन या सारख्या गोष्टींचा समावेश होतो. याशिवाय मजूराचा खर्च किती या सगळ्या गोष्टीचा खर्च काढून मगच गायीच्या एक लिटर दुधाचा खर्च निघतो. एचएफ गायीच्या एक लिटर दुधाचा खर्च काढायचा झाला तर २७ ते २८ रुपये खर्च येतो.
संकरित गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध दिलेच पाहिजे तरच हा खर्च २७ ते २८ रुपये प्रती लिटर पर्यंत येतो. जर गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर दूध न देता कमी दिल तर हा खर्च वाढतो. दूध जर वाढल म्हणजे गायीने एका वेतात तीन ते पाच हजार लिटर पेक्षा दूध जर जास्त दिल तर हा खर्च कमी होतो. अशा प्रकारे आपण कोणत्या दुधाळ जनावरांचा खर्च काढून व्यवसाय फायद्याचा की तोट्याचा हे पडताळून पाहू शकतो.
घरच्याघरी पशुखाद्य तयार कराव का ?
बरेच पशुपालकांचा जनावरांना घरच्याघऱी पशुखाद्य तयार करुन खर्च कमी करण्याकडे कल असतो. पुखाद्यातून जनावराला ऊर्जा, प्रथिनांचा पुरवठा होत असतो. खर्चाचा विचार केला तर एक लिटर दुध उत्पादनासाठी दुधाळ गायी, म्हशीला ३०० ते ३५० ग्रॅम पशुखाद्य खाऊ घालाव लागत.
घरच्या घरी पशुखाद्य तयार करायच असेल तर, पशुखाद्य तयार करताना आपल्याकडे कोणते घटक उपलब्ध आहेत आणि बाहेरुन कोणते घटक विकत घ्यावे लागतील याचा विचार करावा. तुमच्याकडे जर २५ पेक्षा कमी गायी, म्हशी असतील अशा पशुपालकांनी जनावरांना रेडीमेड पशुखाद्य द्याव. पशुखाद्य बनविण्यासाठी ग्राइंडर, मिक्सर या मशीनरी लागतात.
कमी जनावरे असतील तर अशा मशीनरी घेण परवडत नाहीत. आणि जर तुमच्याकडे २५ पेक्षा जास्त जनावरे आहेत अशा पशुपालकांनी घरच्या घरी पशुखाद्य तयार करावे. हे पशुखाद्य तयार करण्यापुर्वी वापरल्या जाणाऱ्या घटकांची तपासणी म्हणजे टेस्टिंग करण अत्यंत गरजेच आहे.
पशुखाद्यातील घटकांच प्रमाण मोजण्यासाठी वजनकाटा आवश्यक आहे. दररोज पशुखाद्य न बनवता पाच दिवसाच किंवा सात दिवसाच पशुखाद्य बनवून ठेवाव लागत. पशुखाद्यांध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांची तपासणी करण, यासारख्या बाबी पशुखाद्य बनवताना लक्षात घेण गरजेच आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.