थोडक्यात माहिती...१. शेतात साचलेले पाणी लवकर निचरा करणे हेच पीक वाचवण्याचे मुख्य साधन आहे.२. पारंपरिक, यांत्रिक व रासायनिक पद्धतींनी पाण्याचा निचरा करून जमिनीची भुसभुशीत स्थिती राखावी.३. खतांची फवारणी (१९:१९:१९ मिश्र खत, डीएपी) पाण्याचा निचरा झाल्यावर करावी.४. एनएए किंवा संप्रेरकांची फवारणी तत्काळ करू नये; पीक सावरल्यानंतरच उपाययोजना कराव्यात.५. पाण्याचा निचरा केल्यानंतर कीड व रोग व्यवस्थापनासाठी एकात्मिक उपाय करणे आवश्यक आहे..Drainage of water: सध्या राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. यामुळे पिके पिवळी पडतात, वाढ खुंटते, कीड रोग बळावतात. शिवाय जमिनीमध्ये पाणी साचलेले असताना केलेल्या उपाययोजना तितक्याशा फलदायी ठरत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा अवस्थेत लवकरात लवकर पाण्याचा निचरा करून जमीन कोरडी करण्यावर भर द्यावा..राज्यात मका, कापूस, सोयाबीन, भात, मूर, तूर, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी ही पिके खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. आता पिके काढणीला आले असताना पावसाने धुमाकुळ घातला आहे. शेतातील साचलेले पाणी लवकरात लवकर काढल्यास शेतकरी पीक आणि उत्पादनाला वाचवू शकतात..Flood Management: पूरपरिस्थिती तयार झालेल्या ऊस क्षेत्रातील व्यवस्थापन करण्याच्या पद्धती.पारंपरिक उपायशेतातील साचलेले पाणी काढण्यासाठी उथळ खड्डे किंवा नाल्या खोदून पाणी बाहेर काढता येते. शेतातील उताराला धरून आडवे चर करून पाणी बाहेर सोडावे. पाण्याचा निचरा करण्यासाठी ही सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. .शेतामध्ये वरंब्यांवर पीक घेतले असल्यास, सऱ्यांमधून पाणी सहज वाहून जावे यासाठी चर स्वच्छ ठेवावेत. खालच्या भागात साचलेले पाणी योग्य मार्गाने बाहेर काढावे. निचरा झाल्यावर मातीची वाफसा स्थिती तयार झाल्यावर लगेच खुरपणी व कोळपणी करून माती भुसभुशीत करावी..यांत्रिक उपायपाणी उपसण्यासाठी मोटार किंवा पंपाने पाणी उपसून बाहेर टाकावे. क्षारपड व पाणथळ जमिनीतून पाणी काढण्यासाठी जमिनीमध्ये विशिष्ट खोलीवर जमिनीत छिद्रे असलेले पाईप्सही (perforated pipes) बसवता येतात. .रासायनिक उपायशेतातील पाणी ओसरल्यानंतर पिकांना पोषण मिळावे यासाठी १९:१९:१९ मिश्र खत किंवा डीएपी १% म्हणजे १० ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पानांवर फवारणी करावी. ही फवारणी सात दिवसांच्या अंतराने घ्यावी. पिकाच्या झाडांना योग्य अन्नद्रव्य पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी..अति पावसामुळे झाडांमधील संप्रेरकांचे संतुलन बदलते. त्यामुळे एनएए किंवा इतर कोणतेही संप्रेरक तत्काळ फवारू नयेत. अकाली फवारणीमुळे उत्पादन घटू शकते. एकदा माती सुकली आणि सूर्यप्रकाश मिळाला की पीक नेहमीसारखे पुन्हा वाढू लागते. ज्या पिकांमध्ये रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव वाढतो, अशा पिकांवर लवकरात लवकर एकात्मिक पद्धतीने प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाय करावे. बऱ्याचदा अतिवृष्टी झालेल्या भागात शेतातील पाण्याचे प्रमाण बघून गरजेनुसार युरीया टाकावा जेणेकरुन पाणी शोषले जाते..वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs): १. अतिवृष्टीत पिके वाचवण्यासाठी पहिले पाऊल कोणते? शेतातील साचलेले पाणी शक्य तितक्या लवकर बाहेर काढणे, पाण्याचा निचरा करणे.२. पारंपरिक पद्धतीने पाण्याचा निचरा कसा करावा? शेतातील उतार धरून चर काढणे व नाल्या खोदणे.३. पाणी ओसरल्यानंतर खतांची फवारणी कधी करावी? मातीची वाफसा स्थिती तयार झाल्यावर १९:१९:१९ मिश्र खत किंवा डीएपीची फवारणी करावी.४. अतिवृष्टी झाल्यावर संप्रेरकांची फवारणी करावी का? नाही, झाड सावरल्यानंतरच करावी; अकाली फवारणी हानिकारक ठरते.५. पाणथळ जमिनीत दीर्घकालीन उपाय काय आहे? छिद्रे असलेले पाईप (perforated pipes) बसवून कायमस्वरूपी निचरा प्रणाली तयार करावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.