थोडक्यात माहिती..१. बांबू लागवड ही शाश्वत शेतीसाठी फायदेशीर, कमी खर्चिक आणि दीर्घकालीन पर्याय आहे.२. एकदा लागवड केल्यानंतर जवळपास ४० वर्षे उत्पादन मिळते.३. बांबूपासून कागद, फर्निचर, टोपल्या, दांड्या यांसारखी अनेक उत्पादने तयार होतात.४. योग्य वाढीसाठी उष्ण व दमट हवामान आणि निचऱ्याची जमीन आवश्यक आहे.५. ५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास एका हेक्टरमधून पाचव्या वर्षी १ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते..Bamboo Farming: सध्या शेतीतून मिळणारा आर्थिक फायदा कमी होत चालला आहे. त्यामुळे पारंपारिक पिके घेणे कठीण झाले आहे. अशा वेळी शाश्वत शेतीचा विचार करणे गरजेचे आहे. यासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय आहे. बांबूचा उत्पादन खर्च हा इतर पिकांपेक्षा बराच कमी असतो. शिवाय एकदा लागवड करुन जवळपास ४० वर्षे त्याचे उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकरी पुरक व्यवसाय आणि शाश्वत शेतीकडे बांबूकडे पाहू शकतात. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कृषिदर्शनीमध्ये बांबूची लागवड करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या मदतीने बांबू लागवड स्पष्ट केली आहे..बांबूचे महत्त्वबांबू लागवड केल्याने जमिनीची धूप थांबते आणि जमिनीचा पोत सुधारतो. बांबूपासून अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होतात. बांबूपासून कागद, चटया, टोपल्या, दांड्या, फर्निचर यांसारखी अनेक उत्पादने तयार केली जातात. बांबूची वाढ झपाट्याने होते आणि तो दणकटही असतो. एकदा लावल्यानंतर ४ ते ५ वर्षांनी बांबुचे उत्पादन घेता येते. त्यानंतर त्याचे जीवनचक्र साधारण ४० वर्ष चालू असते..योग्य हवामान व जमीनबांबूला उष्ण व दमट हवामान जास्त मानवते. जास्त पाऊसमान व चांगला निचरा असलेली जमीन योग्य असते. क्षारपिडीत, पाणथळ किंवा चिबड जमिनीत बांबू तग धरतो पण वाढ चांगली होत नाही..Bamboo Industry: बांबू क्षेत्रासाठी शिक्षण, कौशल्य निर्मिती करावी.बांबूची लागवडबांबूची लागवड बियाणे व कंद या दोन प्रकारे केली जाते. बियाणे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गादी वाफ्यात किंवा पॉलिथिन पिशवीत लावतात. ३-४ महिन्यांनी तयार झालेली रोपे पिशवीत लावून जून-जुलैमध्ये लागवड करतात. बांबूची लागवड कंदाद्वारे करताना साधारण ५ बाय ५ मीटर अंतरावर करतात. या प्रमाणानुसार एका हेक्टरमध्ये सुमारे ४०० रोपे बसतात..लागवडीपूर्व तयारीएप्रिल-मे महिन्यात ६० बाय ६० बाय ६० से.मी. आकाराचे खड्डे तयार करावेत. त्यात शेणखत, अमोनियम सल्फेट व सुपर फॉस्फेट मिसळून भरावे. पावसाळ्यात रोपांची लागवड करावी..लागवडीनंतरची निगालागवड झाल्यावर रोपांभोवतीची तण वेळोवेळी काढावे. माती भुसभुशीत ठेवावी. ओलावा टिकवण्यासाठी गवत किंवा धसकटं आच्छादन म्हणून वापरावे. उन्हाळ्यात पहिल्या दोन वर्षे आठवड्याला किंवा पंधरवड्याला पाणी द्यावे..आंतरपीकसुरुवातीच्या २-३ वर्षांत बांबू लहान असतो. त्यामुळे मटकी, मूग, उडीद, कुळीथ किंवा सोयाबीनसारखी आंतरपिके घेता येतात. यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि जमीन स्वच्छ राहते..शाखा छाटणीप्रत्येक कळकाच्या पेऱ्यामधून फांद्या फुटत असतात व कधीकधी त्या फार लांबसुद्धा वाढतात. बांबूच्या नवीन फांद्या सरळ वाढीस अडथळा करू नयेत म्हणून त्यांची छाटणी करावी. धारदार कात्रीने कळकाच्या अंगालगत जमिनीपासून वर छाटणी करावी..बांबू काढणीलागवडीनंतर ४-५ वर्षांनी बांबू काढणी सुरू करता येते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ काढणीस योग्य आहे. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये काढणी करू नये कारण या काळात वाढ जलद होते. बांबू कापताना जमिनीलगत न कापता दुसऱ्या-तिसऱ्या पेऱ्याजवळ धारदार कुऱ्हाडीने कापावा..उत्पादन आणि उत्पन्न५ बाय ५ मीटर अंतरावर लागवड केल्यास एका हेक्टरमध्ये ४०० रोपे येतात. पाचव्या वर्षी सुमारे २००० बांबू मिळतात. प्रति नग ५० रुपये दर धरला तरी एका हेक्टरमधून साधारण १ लाख रुपये उत्पन्न मिळते. एकदा लागवड केल्यावर ४० वर्षे उत्पादन मिळत राहते आणि दरवर्षी उत्पादन १० ते १५% वाढत जाते..वारंवार विचारले जाणारे प्रश्न(FAQs): १. बांबू लागवड फायदेशीर का आहे? कमी खर्च, दीर्घकालीन उत्पादन आणि विविध औद्योगिक उपयोगामुळे ती शाश्वत व फायदेशीर आहे.२. बांबू लागवडीसाठी कोणती जमीन योग्य आहे? चांगला निचरा असलेली, उष्ण-दमट हवामानाची जमीन सर्वात योग्य आहे.३. बांबू लागवडीसाठी किती अंतर ठेवावे? साधारण ५ x ५ मीटर अंतर योग्य असून एका हेक्टरमध्ये सुमारे ४०० रोपे बसतात.४. बांबूची काढणी कधी करावी? लागवडीनंतर ४-५ वर्षांनी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान काढणी करावी.५. बांबूपासून किती उत्पन्न मिळू शकते? पाचव्या वर्षी एका हेक्टरमधून सुमारे २००० बांबू मिळतात, ज्यातून साधारण १ लाख रुपये मिळतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.