डॉ. एम. बी. पाटील, डॉ. अंगद गरडे, आर. आर. राठोडFruit Quality: उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज आणि काकडी बाजारात मोठ्या प्रमाणात येते. या पाणीदार फळांचे सेवनही मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र बाजारात आलेल्या फळांतून उत्तम दर्जाची फळे कशी ओळखावीत, याची माहिती या लेखातून घेऊ. .कलिंगडजमिनीचा डाग : कलिंगड ज्या बाजूने जमिनीवर टेकलेले असते, तिथे एक डाग तयार होतो. याला ‘बेली स्पॉट’ असेही म्हणतात. तो डाग जर गडद पिवळा किंवा राखाडी-पिवळा असल्यास ते कलिंगड वेलीवर पूर्णपणे पिकलेले असते. असे कलिंगड चवीलाही गोड निघण्याची शक्यता जास्त असते. मात्र हा डाग पांढरा असल्यास ते कलिंगड कच्चे असतानाच तोडले गेले आहे, असे समजावे.कलिंगडाचा देठ : जर कलिंगडाचा देठ वाळलेला आणि तपकिरी रंगाचा असेल, तर ते फळ पूर्ण पिकलेले असते. मात्र देठ अजूनही हिरवा असल्यास फळ लवकर तोडल्याचे समजावे. असे फळ चवीला कमी गोड असू शकते..Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने.आवाजाची चाचणी : कलिंगडावर हाताने हळूच थाप मारून किंवा टिचकी मारून त्याचा आवाज तपासा. आवाज थोडा पोकळ किंवा जड येत असल्यास त्यात रसाळ असून, पाण्याचे प्रमाण भरपूर असते. आवाज खूप पातळ किंवा स्पष्ट येत असेल, तर ते कलिंगड अजून पूर्ण पिकलेले नसते.पृष्ठभागाचा पोत आणि रंग : पूर्ण पिकलेल्या कलिंगडाची साल चमकण्याऐवजी थोडी निस्तेज, गडद आणि मॅट रंगाची दिसते. जर साल खूप जास्त चमकत असेल, तर ते कच्चे असण्याची शक्यता असते..आकार : जातीनुसार कलिंगडाचे गोल आणि अंडाकृती असे आकार दिसतात. खरेदी करताना ते सर्व बाजूंनी व्यवस्थित गोलाकार किंवा अंडाकृती असावे. त्यावर कुठेही काप किंवा जखम नसावी.वजन तपासा : कलिंगड हातात उचलून बघा. जर ते त्याच्या आकाराच्या तुलनेत वजनाला जास्त जड लागत असेल, तर त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असून, रसाळ असते.साखरेचे जाळे : कलिंगडाच्या सालीवर काही वेळा तपकिरी रंगाच्या रेषा किंवा जाळे दिसते. हे जाळे म्हणजे मधमाश्यांनी फुलांचे परागीभवन करताना केलेल्या प्रक्रियेचा परिणाम असतो. जितके जास्त हे तपकिरी जाळे असेल, तितके ते फळ गोड असण्याची शक्यता असते..रसायनांचा वापर किंवा भेसळ ओळखणे : काही वेळा कलिंगड लाल दिसण्यासाठी त्यामध्ये इंजेक्शन दिले जाते. हे ओळखण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या ठरतात.पांढरे चट्टे : कलिंगड कापल्यावर जर त्यात नैसर्गिक लाल रंगाऐवजी खूपच गडद किंवा कृत्रिम रंग दिसत असेल आणि बियांच्या बाजूला पांढरे डाग असतील, तर त्यात भेसळ असू शकते.सालीचा रंग : जर साल हाताला किंवा कपड्याला रंग सोडत असेल, तर त्यावर रंगाचा वापर केलेला असू शकतो..Banana Farming: केळी पिकात बंच फीडिंग तंत्रज्ञान फायदेशीर.खरबूजसुगंधाची चाचणी : पिकलेले खरबूज ओळखण्यासाठी त्याचा वास घेणे ही सर्वांत प्रभावी पद्धत आहे. खरबुजाच्या देठाच्या भागाचा वास घ्यावा. जर तिथून फुलासारखा गोड आणि प्रसन्न सुगंध येत असेल, तर ते फळ पूर्णपणे पिकलेले आणि गोड असते. देठाला कोणताही वास नसेल, तर ते फळ कच्चे असण्याची शक्यता असते.जाळीदार आवरण : खरबुजाच्या बाहेरील सालीवरील रचनेवरून त्याची गुणवत्ता समजते. ज्या खरबुजावर खोल, स्पष्ट आणि एकसंध जाळीसारखे पट्टे असतात, ते खरबूज चवीला जास्त गोड असते..रंग : खरबुजाचा रंग हिरवा नसून सोनेरी पिवळसर असावा. हा रंग ते खाण्यासाठी योग्य असल्याचे दर्शवितो.स्पर्शाने तपासा : खरबुजाला बोटांनी हलके दाबून पाहावे. जर ते किंचित मऊ वाटले, तर ते नीट पिकलेले आहे. मात्र बोट खूप आतपर्यंत जात असेल, तर ते फळ जास्त पिकून सडलेले असू शकते. असे खरबूज घेऊ नका. फळ खूप कडक असेल, तर ते कच्चे असते..वजनाची तुलना : आकाराच्या तुलनेत वजनाला जड असणारे खरबूज निवडावे. जड खरबूज अधिक रसाळ आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असल्याचे लक्षण आहे.देठाचा भाग : पिकलेले खरबूज वेलीपासून नैसर्गिकरीत्या वेगळे होते. देठाच्या आजूबाजूला हलक्या भेगा दिसणे हे फळ तयार असल्याचे लक्षण आहे.टीप : कापलेले खरबूज जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये. अतिशय दबलेले किंवा पिचलेले खरबूज घेतल्यास जंतुसंसर्गाचा धोका असू शकतो..काकडीरंगावरून पारख : उत्तम दर्जाची काकडी नेहमी गडद हिरव्या रंगाची असते. जर काकडीवर पिवळसर छटा दिसत असेल, तर याचा अर्थ ती जास्त पिकलेली आहे आणि तिची चव बिघडलेली असू शकते. पूर्ण काकडीवर रंग सारखा असावा. कुठेही पांढरट किंवा फिक्कट डाग नसावेत.स्पर्शाने तपासा : काकडी हाताने दाबून पाहावी. ती कडक असावी. जर काकडी मऊ किंवा लवचिक लागत असेल, तर ती शिळी झाली आहे किंवा आतून सडलेली असू शकते. विशेषतः देठाकडचा भाग दाबून पाहावा, तो कडक असावा. जर तो भाग मऊ असेल, तर काकडी कडू निघण्याची शक्यता जास्त असते..आकार आणि लांबी : खूप मोठी किंवा जाड काकडी घेऊ नका. मोठ्या काकडीत बिया जास्त असतात आणि ती चवीला पाणचट किंवा कडू असू शकते. ६ ते ८ इंच लांबीची मध्यम काकडी खाण्यासाठी सर्वोत्तम असते. काकडी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच जाडीची असावी. जर काकडी एका टोकाला फुगीर आणि दुसऱ्या टोकाला निमुळती असेल, तर ती व्यवस्थित वाढलेली नसते.सालीचा पोत : गावरान काकडीवर छोटे काटे किंवा खडबडीतपणा असतो, जो ताजेपणा दर्शवितो. संकरित जाती किंवा ‘ककॅम्बर’ची साल गुळगुळीत आणि चमकदार असावी. त्यावर सुरकुत्या नसाव्यात..वजन : काकडी हातात घेतल्यावर तिच्या आकाराच्या तुलनेत जड वाटली पाहिजे. जड काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते आणि ती आतून पोकळ नसते.कडू काकडी कशी ओळखावी? काकडीच्या टोकाचा भाग (जिथे देठ असतो) अधिक गडद हिरवा आणि सुरकुतलेला असेल, तर ती काकडी कडू असण्याची शक्यता असते.प्रगत पद्धत : काकडी कापल्यानंतर टोकाचा भाग घासल्याने पांढरा फेसाळ पदार्थ (कुकर्बिटासिन) बाहेर येत असल्यास त्यामुळे कडूपणा कमी होण्यास मदत होते.- डॉ. अंगद गरडे (सहायक प्राध्यापक)८४०८८३८४५०उद्यान विद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.