Beed News: ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायती सध्या बीड जिल्ह्यात नेतृत्वाच्या संकटात सापडल्या आहेत. मुदत संपूनही निवडणुका न झाल्याने आधीच २७ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त असताना, आता पुढील महिन्यात (फेब्रुवारी) आणखी ११९ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्यांची कोणतीही प्रशासकीय तयारी नसल्याने, जिल्ह्यातील एकूण १५६ गावांचा कारभार आता थेट सरकारी अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनंतर आता गावपातळीवरील मिनी मंत्रालयही लोकप्रतिनिधींविना पोरके होणार आहे..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या साखळीत ग्रामपंचायतहा सर्वात महत्त्वाचा आणि लोकांच्या थेट संपर्कातील दुवा मानला जातो. मात्र, बीड जिल्ह्यातील ११९ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपत असूनही अद्याप निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार कोणतीही पूर्वतयारी झालेली नाही. मतदार याद्यांचे पुनर्निनिरीक्षण किंवा वार्ड रचनेची प्रक्रिया न झाल्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणे निश्चित मानले जात आहे..Rural Governance: यवतमाळ जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतींवर प्रशासक.आरक्षणाचा पेचजिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींवर तर गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पाटोदा, शिरूर कासार, केज, गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील १८ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता..Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक.तालुकानिहाय मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबीड ः जेबापिंप्री, वरवटी, म्हाळसापूर, पालवण, कळसंबर, कोळवाडी, नागझरी इत्यादी.केज ः विडा, येवता, लाखा, बोबडेवाडी, पाथरा, बानेगाव, सुकळी..गेवराई ः सिरसमार्ग, मादळमोही, गढी, तलवाडा, कुंभारवाडी, सुर्डी.परळी ः सोनहिवरा, हिवरा, लाडझरी, मोहा इत्यादी.इतर तालुके : पाटोदा (०८), शिरूर कासार (०९), अंबाजोगाई (०७) आणि धारूर (०५) या ग्रामपंचायतींचाही समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.